शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अभिजात चित्रपटांची पर्वणी

By admin | Updated: February 2, 2017 03:46 IST

विविध भाषांमधले ‘अभिजात’ (क्लासिक्स) चित्रपट तेही दुर्मिळ आणि मूळ दर्जात पाहायला मिळाले तर? ही ‘सुवर्णभेट’ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून (एनएफएआय) चित्रपटप्रेमींना

पुणे : विविध भाषांमधले ‘अभिजात’ (क्लासिक्स) चित्रपट तेही दुर्मिळ आणि मूळ दर्जात पाहायला मिळाले तर? ही ‘सुवर्णभेट’ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून (एनएफएआय) चित्रपटप्रेमींना दिली जाणार आहे. आज (दि. १ फेब्रुवारी) एनएफएआयचा ५३ वा स्थापना दिवस आहे. त्याचे औचित्य साधून दि. ४ व ५ फेब्रुवारी रोजी ‘अभिजात चित्रपटांच्या महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेने जतन केलेले काही दुर्मिळ चित्रपट नव्या डीसीपी प्रोजेक्टरवर रसिकांना पाहण्याची संधी मिळणार आहे. मूळ स्वरूपात हे चित्रपट जसे निर्मित करण्यात आले होते, त्या चित्रपटांचे ‘डिजिटायझेशन’ करून ते जतन करण्यात आल्याने मूळ दर्जात्मक चित्रपटाचा ‘फिल’ नव्या डीसीपी प्रोजेक्टरच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी ‘मेघेढाका तारा’ (बंगाली), तन्नीर तन्नीर (तमिळ) आणि दो बिघा जमीन (हिंदी), तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे संगीत दिग्दर्शित आणि अभिनित ‘गुळाचा गणपती,’ ‘मथिलुकल (मल्याळम) व ‘कागज के फूल (हिंदी) हे ‘अभिजात’ चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच दि. ४ रोजी एनएफएआय येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत ‘हेरिटेज वॉक’ आयोजिण्यात आला आहे. (प्रतिनिधी)एनएफएआयमध्ये आज स्नेहमेळावाकर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमाबरोबरच चित्रपट क्षेत्राशी संबंधित संस्था, व्यक्ती, अभ्यासक यांचा स्नेहमेळावा उद्या (बुधवारी) एनएफएआयच्या स्थापनादिनानिमित्त रंगणार आहे. कोलकत्यातील निर्मात्याकडून दुर्मिळ चित्रपटांचा खजिना उपलब्ध अंजन बर्वे आणि नरेश बोर्डे यांनी आपल्याजवळील पोस्टर्स, बुकलेट्स असा १००० दुर्मिळ वस्तूंचा संग्रह एनएफएआयकडे सुपूर्त केला आहे. कोलकत्त्यातील सुनील जिंदाल या निर्मात्याकडून १६ एमएमच्या हिंदी आणि बंगाली चित्रपटांचा खजिना उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये शर्बोन डे, राज बोधू, चंद्रनाथ अशा २५ चित्रपटांचा समावेश आहे. दीप्ती नवलकडून मिळाली ‘चेतना’ची मूळ संहिताअभिनेत्री दीप्ती नवल यांनी ‘चेतना’ या बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘चेतना’ची मूळ संहिता एनएफएआयला दिली आहे. तसेच दीप्ती नवल यांनी स्वत: दिग्दर्शित केलेला आणि गुलजार यांनी शीर्षकगीत लिहिलेला ‘दो पैसे की धूप, चार आनेकी बारिश’ हा अप्रदर्शित चित्रपटदेखील एनएफएआयला देण्याचे त्यांनी मान्य केले असल्याचे मगदूम यांनी सांगितले.