शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

क्लास-महाविद्यालयांचा छुपा करार, यंदाही ‘त्या’ महाविद्यालयांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:50 IST

आयआयटी, जेईई आणि नीट... अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचा तसा उपयोगच नाही. त्यामुळे कशाला महाविद्यालयांमध्ये वेळ घालवायचा, म्हणून क्लासचालकांनी विद्यार्थ्यांना आकाशाची स्वप्ने दाखवायला सुरुवात केली आहे.

पुणे - आयआयटी, जेईई आणि नीट... अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचा तसा उपयोगच नाही. त्यामुळे कशाला महाविद्यालयांमध्ये वेळ घालवायचा, म्हणून क्लासचालकांनी विद्यार्थ्यांना आकाशाची स्वप्ने दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक शाळा आणि महाविद्यालयांची मात्र चांदी झाली आहे. चुकूनही प्रवेश घेऊ नये अशा सुविधा आणि गुणवत्ता असणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना गुणवंतांची पसंती मिळाल्याचे चित्र अकरावी प्रवेशाच्या कटआॅफ गुणांच्या यादीतून पुढे आले आहे.इयत्ता अकरावी प्रवेशाच्या कटआॅफ गुणांच्या यादीत यंदाही खासगी क्लासशी छुपा करार करणाºया काही महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची पसंती मिळाल्याचे दिसते. नामांकित महाविद्यालयांना मागे टाकून काही महाविद्यालयांनी क्लासच्या मदतीने विद्यार्थ्यांची गर्दी खेचण्यात यश मिळविले.राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक हजेरी शक्कल लढविली असली, तरी या छुप्या करारांवर काहीही परिणाम झालेला नसल्याचेच यातून स्पष्ट होते. काही वर्षांपासून शहरातील काही खासगी क्लास व काही महाविद्यालयांमध्ये छुपा करार केला जात आहे. या करारानुसार संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना केवळ प्रात्यक्षिकांना उपस्थित राहण्याची मुभा दिली जाते. या विद्यार्थ्यांना वर्गात बसणे बंधनकारक नसते. त्यांची हजेरी महाविद्यालयांकडूनच लावली जाते. त्यामुळे विद्यार्थी केवळ क्लासमध्येच उपस्थिती लावतात. परिणामी, संबंधित महाविद्यालयांचे वर्ग ओस पडतात. प्रामुख्याने चांगले गुण मिळालेले विद्यार्थी नामांकित, दर्जेदार शिक्षण देणाºया महाविद्यालयांना पसंती देतात; पण अनेक विद्यार्थी क्लासला प्राधान्य देतात. क्लासच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांच्याकडून आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेद्वारे महाविद्यालयांची निवड केली जाते. आॅनलाईन प्रक्रियेत अर्ज कसा भरावा, पसंतीक्रम कसे टाकावेत, याची सर्व माहिती संबंधित क्लास व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना दिली जाते. मागील अनेक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना कधीही माहीत नसलेली महाविद्यालये अचानक हवीहवीशी वाटू लागले आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होत आहे.प्रकाशझोतात नसलेली महाविद्यालये वाटू लागली विद्यार्थ्यांना हवीहवीशीदहावीची परीक्षा झाल्यापासूनच पालकांना या क्लासचालकांचे फोन यायला सुरुवात झाली. त्यांच्याकडूनच कोणत्या शाळा-महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, हे विद्यार्थ्यांना सांगण्यातआले.दररोज महाविद्यालयात जाण्याची गरज नाही. सर्व अभ्यास क्लासमध्येच करून घेण्यात येईल. त्यामध्येही जास्त भर हा सीईटीवर दिला जाईल, असे सांगण्यात येते.छुप्या करारामुळे मागील काही वर्षांत कधीही प्रकाशझोतात नसलेली महाविद्यालये विद्यार्थ्यांना अचानक हवीहवीशी वाटू लागली आहेत.यंदाच्या पहिल्या फेरीच्या कटआॅफ यादीतही हे पाहायला मिळत आहेत. संबंधित महाविद्यालयांनी कटआॅफमध्ये नामांकित महाविद्यालयांनाही मागे टाकले आहे.या करारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी विज्ञान शाखेसाठी बायोमेट्रिक हजेरीचा महाविद्यालयांकडे आग्रह केला आहे. त्यानुसार शिक्षण विभागानेही सर्व शिक्षणाधिकाºयांना याबाबत महाविद्यालयांना अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांची हजेरी पाहण्यासाठी सांगितले आहे. पण, यानंतरही या करारांवर काहीही परिणामझाल्याचे दिसत नाही. संबंधित महाविद्यालयांचे कटआॅफ पाहिल्यानंतरहे करार यंदाही झाल्याचे दिसत असून त्यानुसार प्रवेशही सुरू झाले असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयnewsबातम्या