शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गजा मारणे टोळीकडून येरवडा कारागृहात राडा; जेवणाचा पाटा डोक्यात घातला, १ जखमी

By विवेक भुसे | Updated: May 11, 2023 09:38 IST

रात्री अ‍ॅडमिशन चेकींग सुरु असताना या गुंडांच्या टोळीमध्ये पुन्हा वाद उदभवला. यावेळी एकाने दुसर्‍या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात पाट घातल्याने त्यात तो जखमी झाला

पुणे - मोक्का अंतर्गत जेरबंद असलेल्या गजा मारणे टोळीतील गुंडांनी बुधवारी रात्री येरवडा कारागृहात राडा घातला. त्यात जेवणाचा पाटा डोक्यात घातल्याने एक जण जबर जखमी झाला आहे.

येरवडा कारागृहात वेगवेगळ्या बराकीत मोक्का अंतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेले ७०० ते ८०० गुन्हेगार आहेत. त्यांच्यात अधुनमधून कुरबुरी सुरु असतात. कारागृहात बुधवारी दुपारी कॅरम खेळत असताना कैद्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी तेथील जेल सुरक्षा रक्षकांनी ही भांडणे सोडवली. त्यानंतर सर्व जणांना त्यांच्या बराकीत बंद करण्यात आले होते. 

रात्री अ‍ॅडमिशन चेकींग सुरु असताना या गुंडांच्या टोळीमध्ये पुन्हा वाद उदभवला. यावेळी एकाने दुसर्‍या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात पाट घातल्याने त्यात तो जखमी झाला. सुरक्षा रक्षकाने त्यांना तातडीने बाजूला केले. त्यानंतर या सर्व गुंडांची वेगवेगळ्या बराकीत रवानगी करण्यात आली. 

याबाबत येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितले की, रात्री कारागृहात कैद्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यात एक जण जखमी झाला आहे. त्या कैद्यांना आता वेगवेगळ्या बराकीत ठेवण्यात आले आहे. आज त्यांचे जबाब घेऊन आवश्यक ती तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :yerwada jailयेरवडा जेल