शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील झोपडपट्ट्या असुरक्षित

By admin | Updated: May 13, 2016 00:58 IST

पुण्यातील मंगळवार पेठेतील झोपडपट्टीला शॉर्टसक्रिटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ५० झोपड्या खाक झाल्याची घटना सोमवारी घडली

चिंचवड : पुण्यातील मंगळवार पेठेतील झोपडपट्टीला शॉर्टसक्रिटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ५० झोपड्या खाक झाल्याची घटना सोमवारी घडली. झोपडपट्टीला लागलेल्या या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक विभागाला शर्तीचे प्रयत्न करावे लागले. कारण झोपडपट्टीतील आगीच्या ठिकाणी अग्निशामक बंब जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवायला मोठ्या प्रमाणात वेळ लागून, मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. अत्यंत दाटीवाटीने असलेल्या झोपडपट्टयांच्या ठिकाणी चारचाकी वाहन जाण्यासाठी जागा नसल्यामुळे या आगीवर अग्निशामक विभागाला लवकर नियंत्रण मिळविता आले नसल्याचे अग्निशामक विभागाने सांगितले. दरम्यान, मंगळवार पेठेतील झोपडपट्टीप्रमाणेच पिंपरी-चिंचवमधील झोपडपट्टीतही अशीच परिस्थिती असून, या ठिकाणीही अशी परिस्थिती उद्भभवल्यास या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत सध्या २००२ च्या सर्वेक्षणानुसार ७१ झोपडपट्टया आहेत. यामध्ये शासनामार्फत घोषित केलेल्या ३७ व अघोषित ३४ झोपडपट्टया आहेत. या झोपडपट्टयांमध्ये महापालिकेच्या जागेवर ६, प्राधिकरणाच्या जागेवर ८, एमआयडीसी १६, सरकारी १६,खासगी २५ 6अशा ठिकाणी शहरातील झोपडपट्टीचा विस्तार आहे. दरम्यान महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागातर्फे जेएनएनयूआरएम व बीएसयूजी या योजनेअंतर्गत झोपडपट्टयांच्या ठिकाणी नवीन प्रकल्प राबविण्यात येत असले तरी, बहुतांश झोपडपट्टया आज मोठ्या प्रमाणात तेथे झालेली अत्यंत दाटीवाटी आणि अरुंद रस्त्यांमुळे असुरक्षित झाले असल्याचे लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत दिसले. झोपडपट्टींच्या ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर असून,या ट्रान्सफॉर्मरच्या शेजारीच झोपडपट्टीतील रहिवाशांनी आपली घरे उभी केली आहेत. पावसाळी दिवसांत या ट्रान्सफॉर्मवरील लोखंडी खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असते. असे असताना देखील येथील नागरिकांनी अंतरही न ठेवता दाटीवाटीने ट्रान्सफॉर्मरला लागूनच झोपडपट्टया थाटल्या आहेत. काही ठिकाणी विद्युत तारा लोंबकळलेल्या देखील आहेत. कदाचित या ठिकाणी शॉर्ट सक्रिट होऊन दुर्घटना उद्भभवल्यास या ठिकाणींही मदतकार्य पोहचविण्यास अडथळा होणार असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)