शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

शहरातील पायाभूत सुविधा होणार ‘स्मार्ट’

By admin | Updated: January 5, 2017 03:16 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश केल्याचे पत्र शासनाने महापालिकेस पाठविले असून, नव्याने या संदर्भातील आराखडा तयार करण्याची सूचना

पिंपरी : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश केल्याचे पत्र शासनाने महापालिकेस पाठविले असून, नव्याने या संदर्भातील आराखडा तयार करण्याची सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेकडून स्मार्ट सिटीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गुणवत्ता असतानाही स्मार्ट सिटी योजनेत समावेशास विलंब झाल्याचेही राज्य शासनाने मान्य केले आहे. या योजनेसाठी पाच वर्षांसाठी हजार कोटींचा निधी मिळणार असून, त्यातून शहरातील पायाभूत सुविधा सक्षमीकरणावर भर दिला जाईल.केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेसाठी देशपातळीवरील महापालिकांमध्ये स्पर्धा घेण्यात आली आली. त्यानुसार गुणांकन करण्यात आले होते. पहिल्या यादीत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश पुण्याच्या बरोबरीने केला होता. त्यात पिंपरी-चिंचवडला ५५.२ टक्के गुण मिळाले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने ऐनवेळी नगरविकास खात्याला अंतिम यादी सादर करताना राज्य सरकारकडून डावलण्यात आले होते. त्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, मनसे, स्वराज अभियान अशा विविध पक्षांनी स्मार्ट सिटीत समावेश न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आंदोलने झाली होती. तसेच खासदार, आमदार, महापौर आदी प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, नगरविकास खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन पिंपरीकरांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी केली होती. त्या वेळी हीच चूक राज्य सरकारची आहे, असे बोट नगरविकास खात्याने दाखविले होते. त्यानंतर पुण्यातील मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यात स्मार्ट सिटीत समावेश करण्याचे नगरविकास मंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राज्य सरकारनेयाबाबत महापालिकेला पत्र पाठविले आहे, हे पत्र मंगळवारी मिळाले. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. (प्रतिनिधी)पॅन इरिया तयार करणारस्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात कोणता भाग पॅन इरिया करायचा यावर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पुण्यात बाणेर हा परिसर होता. पिंपरी-चिंचवडमध्ये हा भाग निश्चित केला जाणार आहे. तसेच एसपीव्ही संस्थेची निर्मिती केली जाणार आहे.संकेतस्थळ विकसित करणारस्मार्ट सिटीसाठी नव्याने संकेतस्थळ विकसित केले जाणार असून, त्यावरून नागरिकांच्या सूचनांसाठी आवाहन केले जाणार आहे. तसेच सोशल मीडिया, प्रबोधनासाठी विविध शाळांमध्ये निबंध आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. हजार कोटी रुपये मिळणार पाच वर्षांसाठी?या योजनेसाठी केंद्र शासनाकडून शंभर कोटी, राज्य आणि महापालिकेकडून प्रत्येकी पन्नास कोटी असा वर्षाला दोनशे कोटींचा निधी मिळणार आहे. पाच वर्षांसाठी हजार कोटींचा निधी मिळणार आहे. समावेशाला विलंब झाल्याची कबूलीस्मार्ट सिटीच्या स्पर्धेत गुण असतानाही दुसऱ्या यादीत पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला नव्हता. याबाबत शासनाने पिंपरी महापालिकेला केलेल्या पत्रव्यवहारात विलंब झाल्याचे मान्य केले आहे.मोठे प्रकल्प नाहीतस्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने पवना नदीसुधार, बीआरटी, मेट्रो, उड्डाणपूल यांचे प्रकल्प मार्गी लागतील असा समज होता. मात्र, या योजनेत मोठे प्रकल्प मार्गी लागणार नाही. शहर वायफाय करणे, स्मार्ट सिग्नल यंत्रणा उभारणे, घनकचरा व्यवस्थापन, वेस्ट टू एनर्जी अशा स्मार्ट सुविधांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.