शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांअगोदर शहराध्यक्ष बदलाची मागणी

By admin | Updated: December 30, 2015 03:16 IST

महापौरपदाची मुदत संपल्यानंतर नव्या महापौरांची नावनिश्चिती होण्यास विलंब होण्यामागे पक्षाच्या शहराध्यक्षपदाची मागणी असल्याची चर्चा आहे. पक्षाचे संघटन संपले असून, त्यामुळेच

पुणे : महापौरपदाची मुदत संपल्यानंतर नव्या महापौरांची नावनिश्चिती होण्यास विलंब होण्यामागे पक्षाच्या शहराध्यक्षपदाची मागणी असल्याची चर्चा आहे. पक्षाचे संघटन संपले असून, त्यामुळेच महापालिकेत सत्ता असूनही पक्षवाढीसाठी त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे अनेक नगरसेवकांचे म्हणणे आहे. एकदम दोन पदांच्या निवडीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पक्षश्रेष्ठींना यावर निर्णय घेण्यास विलंब होत आहे.विद्यमान महापौर दत्तात्रय धनकवडे यांना पक्षाने दिलेली महापौरपदाची मुदत १५ डिसेंबरलाच संपली. त्यापूर्वी महिनाभर आधीपासूनच महापौर बदलाची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. डिसेंबरमध्ये या चर्चेने जोर धरला, मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यामुळे ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. आता तो कार्यक्रम झाल्यानंतर काही नगरसेवकांनी अचानक महापौर बदलाबरोबरच शहराध्यक्ष बदलावेत, अशी चर्चा सुरू केली आहे. विद्यमान शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण व पालिकेतील राष्ट्रवादीचे बहुसंख्य नगरसेवक यांच्यात अनेक विषयांवरून वाद आहेत. नगरसेवक घेतील त्या भूमिकेच्या नेमकी विरोधातील भूमिका चव्हाण यांच्याकडून घेतली जाते. जैववैविध्य उद्यानांसाठीच्या आरक्षणावरून हे प्रकर्षाने दिसून आले. त्यातूनच त्यांना बदलावे, अशी मागणी साधारण वर्षभरापूर्वी झाली होती. माजी महापौर अंकुश काकडे यांच्यासह तब्बल १० नावे या पदासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती. मात्र, त्या वेळी या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले व चव्हाण यांना दुसरी टर्म मिळाली. दरम्यानच्या काळात पक्षाचे शहरातील संघटन कमी झाले आहे. खासदारपदामुळे चव्हाण यांना पक्ष संघटनेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कार्यकारिणीसह शहर शाखेच्या कोणत्याही आघाडीला काही अस्तित्व राहिलेले नाही.त्यामुळेच महापालिकेत सत्ता असूनही पक्षाची शहरातील अवस्था अशी गलितगात्र झाली आहे. तुलनेने काँग्रेससह अन्य पक्षांची शहरामध्ये सातत्याने आंदोलने सुरू असतात. राज्यात व केंद्रात सत्तेत असतानाही भाजपा स्वस्त तूरडाळ विक्री सारखे उपक्रम व सेना वरण-भात मोर्चासारख्या आंदोलनांमुळे चर्चेत असते. (प्रतिनिधी)