शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

शहरात होणार ६९ कोटींचे पदपथ, प्रशासन, नगरसेवक दोघांचीही कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:59 IST

येत्या वर्षभरामध्ये शहरात तब्बल ६९ कोटी रुपयांचे पदपथ विकसन म्हणजे आहे त्या पदपथांचे काम होणार आहे. २४ तास पाणी योजनेसाठी शहरातील सर्वत्र टाकण्यात येणा-या जलवाहिन्यांच्या कामासाठी रस्त्यांबरोबरच पदपथही फोडावे लागणार आहेत.

पुणे : येत्या वर्षभरामध्ये शहरात तब्बल ६९ कोटी रुपयांचे पदपथ विकसन म्हणजे आहे त्या पदपथांचे काम होणार आहे. २४ तास पाणी योजनेसाठी शहरातील सर्वत्र टाकण्यात येणा-या जलवाहिन्यांच्या कामासाठी रस्त्यांबरोबरच पदपथही फोडावे लागणार आहेत. मात्र सिमेंटच्या रस्त्यांना मनाई व पदपथासाठी मात्र वारेमाप खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.शहरात साधारण ७०० ते ८०० किलोमीटर अंतराचे पदपथ आहेत. त्यांची रुंदी कमी-जास्त आहे तसेच प्रत्येक रस्त्याला पदपथ आहेच असे नाही. पदपथांची उंची रस्त्यांपेक्षा थोडी जास्त असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ते असतात. पायी चालणाºयांना सुरक्षित वाटावे यासाठी त्यांची निर्मिती केली जाते. हे पदपथ पूर्वी फरशा टाकून तयार केले जात असत. त्यानंतर त्यावर सिमेंटचे ब्लॉक बसवले जाऊ लागले. आता रंगीत पेवर ब्लॉक बसवले जातात. प्रभागातल्या पदपथांवर आहे त्या फरशा, किंवा जुने ब्लॉक काढून तिथे नवीन रंगीत आकर्षक ब्लॉक बसविणे ही प्रभाग विकासाची पहिली इयत्ता समजली जाते. नागरिकांची मागणी असो वा नसो, या कामांचे प्रस्ताव नगरसेवकांकडून तयार केले जातात व प्रशासनाला सादर होतात. २० लाखांपासून पुढचीच ही सर्व कामे आहेत. काही ठिकाणी ती ५० लाखांपेक्षा जास्त रकमेची आहेत. पदपथाचे अंतर वाढले की खर्चही वाढतो.नगरसेवकस्तरावर व आयुक्त स्तरावर अशा दोन्ही विभागांकडून पदपथ विकसनाची कामे सुचवली जातात. यावर्षीच्या अंदाजपत्रकात प्रशासनाने अशा कामांसाठी ३३ कोटी ४० लाख ९ हजार ५०० रुपयांची तरतूद केली आहे. नगरसेवकस्तरावर म्हणजे स यादीसाठी ही तरतूद ३७ कोटी ३६ लाख रुपये इतकी आहे. दोन्ही मिळून ६८ कोटी ८५ लाख ९ हजार ५०० रुपयांची तरतूद पदपथ विकसन या एकट्या कामासाठी आहे. या तरतुदीला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली असल्याने आता ही तरतूद याच कामासाठी लॉक करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच या कामांचे प्रस्ताव तयार केले जातील व निविदाही काढली जाईल.>फोडाव्या लागणाºया पदपथांचे काम करणार नाहीपदपथांची कामे जास्त असतात हे बरोबर आहे. त्यासाठी दरवर्षीच इतकी तरतूद केली जाते व ती खर्चही होते. २४ तास पाणी योजनेसाठी रस्त्यांबरोबरच काही ठिकाणी पदपथही फोडावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी वेळ आली तर ती कामे केली जाणार नाहीत.- राजेंद्र राऊत,अधीक्षक अभियंता, पथविभाग>जास्तीची तरतूदचोवीस तास पाणी योजनेचे काम करायचे असल्याने सिमेंटच्या रस्त्यांसाठी तरतूद करण्याची आवश्यकताच नव्हती, मात्र तरीही प्रशासन व नगरसेवक मिळून तब्बल २५० कोटींपेक्षा जास्त रकमेची तरतूद करण्यात आली आहे. आता ती रक्कम वर्ग करून घेतली जाणार आहे, तसेच पदपथांची कामेही होणार आहेत. शहरातील पदपथांसाठी जी ६९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ती पदपथांचे नंदनवन करता येईल इतकी आहे. तीही आता वर्ग करून घेतली जाईल.- चेतन तुपे,विरोधी पक्षनेते, महापालिका