शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ऑक्टोबरनंतर गुरुवारी प्रथमच उच्चांकी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाबाधितांची ऑक्टोबरनंतर प्रथमच उच्चांकी वाढ दिसून आली आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल १ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची ऑक्टोबरनंतर प्रथमच उच्चांकी वाढ दिसून आली आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल १ हजार ५०४ नवे कोरोनाबाधित आढळून आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ही रेट साडेसतरावर कायम असून, आजही ही टक्केवारी १७.५८ टक्के इतकी आहे़

आज दिवसभरात या आठवड्यातील कोरोना संशयितांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महापालिकेच्या दीड हजार तपासण्यांसह खासगी प्रयोगशाळा मिळून ८ हजार ५५३ जणांनी कोरोना तपासणी करून घेतली आहे़

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रुग्ण संख्या साडेआठ हजाराच्या पुढे गेली आहे़ आजमितीला शहरात ८ हजार ५४१ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ७३९ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, या व्यतिरिक्त ३५७ रुग्ण हे गंभीर आहेत़

शहरात आजपर्यंत १२ लाख २० हजार ९०० हजार जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी २ लाख १३ हजार २५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९९ हजार ५६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी ६ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ९१७ जणांचा मृत्यू झाला आहे़