पुणे : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याकरिता महापालिकेने अहमदाबादच्या जनमार्ग या सल्लागार कंपनीकडून अहवाल मागविला होता. पुढील आठवड्यात अहवाल आल्यानंतर बीआरटी मार्ग नागरिकांना खुला होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. नगर रस्ता, विश्रांतवाडी रस्ता आणि संगमवाडी रस्ता असा सुमारे १६ किलोमीटरचा बीआरटी मार्ग तयार करण्यात आला आहे. कात्रज व हडपसर मार्गावरील मिश्र बीआरटीचा प्रयोग फसला आहे. त्यामुळे नगर रस्त्यावर अहमदाबादच्या धर्तीवर डेडिकेटेड बीआरटी मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहेया निर्णयानुसार कोट्यवधी रुपये खर्चून बीआरटी मार्गही तयार करण्यात आला आहे. थर्डपार्टी संस्थेने त्याची पाहणी करून काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्यानुसार आवश्यक बदल करण्यात आले होते. परंतु, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बीआरटी मार्ग सुरू करण्यास राजकीय दबाव होता. त्यामुळे सहा महिन्यांपासून बीआरटी मार्ग बंद होता. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला होता. (प्रतिनिधी)
नगर रस्ता होणार खुला
By admin | Updated: October 24, 2014 05:11 IST