शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शहर बचाव समिती मैदानात

By admin | Updated: December 13, 2015 02:58 IST

महापालिकेची कंपनी करून मूठभर नागरिकांच्या हितासाठी शहराची विकासाची दिशा घातक पातळीवर नेण्याचा घटनाबाह्य प्रकल्प स्मार्ट सिटीच्या नावाने पुणेकरांच्या माथी मारला

पुणे : महापालिकेची कंपनी करून मूठभर नागरिकांच्या हितासाठी शहराची विकासाची दिशा घातक पातळीवर नेण्याचा घटनाबाह्य प्रकल्प स्मार्ट सिटीच्या नावाने पुणेकरांच्या माथी मारला जात असून, या प्रकल्पास विरोध करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीने पुणे शहर बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने येत्या सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजल्यापासून महापालिकेबाहेर ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी महापौर भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याच दिवशी मुख्य सभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. समितीच्या शनिवारी झालेल्या पहिल्या वहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉंम्रेड अजित अभ्यंकर यांनी दिली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, केंद्र शासनाच्या आदेशानुसार, महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या या प्रस्तावात पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या नावाखाली औंध-बाणेर-बालेवाडी भागातील ४० हजार नागरिकांसाठी तब्बल २८०० कोटींचा खर्च केला जाणार आहे तर उर्वरित ४० लाख पुणेकरांसाठी ७८० कोटींचा खर्च केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या एसपीव्हीची माहिती न देताच या कंपनीला खर्चाचे अधिकार दिले जाणार आहेत. त्यासाठी पुणेकरांचे नाव पुढे करीत नगरसेवकांना पुढे करून हा प्रस्ताव मान्य करण्याचा घाट घालण्यात आला आहे. एकीकडे गेल्या १३ वर्षांपासून शहराचा विकास आराखडा मान्येसाठी पडून असताना, राज्यशासन या प्रस्तावाच्या मान्यतेची घाई करत आहे. त्याला नगरसेवकांनी आपल्या लोकशाही मार्गाने दिलेल्या अधिकाराने विरोध केला आहे. मात्र, त्यांच्या या अधिकाराला आव्हान देत महापालिका प्रशासन महानगर पालिका अधिनियम ४४८ चा वापर करून नगरसेवकांना बदनाम व ब्लॅकमेल करत आहे. या प्रकल्पातील तरतूदी पाहता त्यात सरळ सरळ छुपे हितसंबध असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकल्पास सर्व ताकदीनिशी विरोध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीस युवाजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, राष्ट्रवादी कामगार सेलचे उपाध्यक्ष अ‍ॅड. म. वि. अकोलकर, शहर नियोजन तज्ज्ञ अनिता बेंनजिर, परिसरचे सुजीत पटवर्धन, नगरसेवक डॉ. सिध्दार्थ धेंडे, महाराष्ट्र कामगार मंचाचे दिलीप मोहीते, भारीप बहुजन महासंघाच्या वैशाली चांदणे, जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे, सिटूचे वसंत पवार, कागद काच पत्र पंचायतीचे विष्णू श्रीमांगले, युवा भारतीचे अँड. भूषण पवार, रिपब्लीकन विद्यार्थी परिषदेचे सतिश गायकवाड, एसएफआयचे विलास साबळे उपस्थित होते.- पुण्याला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार, महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या या प्रस्तावात पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या नावाखाली औंध-बाणेर-बालेवाडी भागातील ४० हजार नागरिकांसाठी तब्बल २८०० कोटींचा खर्च केला जाणार आहे तर उर्वरित ४० लाख पुणेकरांसाठी ७८० कोटींचा खर्च केला जाणार आहे.