शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीमुळेच थांबला शहराचा विकास

By admin | Updated: January 31, 2017 04:16 IST

पुणे शहराचा विकास महापालिकेच्या सत्तेत गेली सलग १० वर्षे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या आघाडीमुळेच थांबला आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश

पुणे : पुणे शहराचा विकास महापालिकेच्या सत्तेत गेली सलग १० वर्षे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या आघाडीमुळेच थांबला आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. अकार्यक्षम, भ्रष्टाचारी, नियोजनशून्य अशा शब्दांत बापट यांनी महापालिकेच्या कारभाराची संभावना केली.‘निष्क्रियतेची १० वर्षेन अशा नावाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाबाबत आलेल्या बातम्यांची कात्रणे, छायाचित्रे यांचा त्यात समावेश आहे. बापट यांच्या उपस्थितीत कॉमन मॅनच्या गणवेशात असलेल्या युवकाच्या हस्ते काळी फीत कापून रविवारी सकाळी या प्रदर्शनाचे उद््घाटन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच पक्षाचे नगरसेवक, उमेदवारासाठी इच्छुक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.बापट म्हणाले, ‘‘केंद्रात, राज्यात व महापालिकेत याच दोन पक्षाची १० वर्षे सत्ता होती; मात्र त्यांना पुणे शहराच्या विकासासाठी काहीही करता आले नाही. नियोजन नाही, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार यामुळे शहराचा विकास खुंटला. याउलट, भाजपाने केंद्र व राज्यातील गेल्या दोन वर्षांच्या सत्तेत मेट्रो, स्मार्ट सिटी, पुणे विकास आराखडा, रिंगरोड, पीएमआरडीएची स्थापना, मुळा-मुठा शुद्धीकरण आदी प्रकल्पांना चालना दिली. महापालिकेतही एकहाती सत्ता मिळाली तर हे सर्व प्रकल्प गतीने मार्गी लावता येतील.’’ गोगावले यांचेही या वेळी भाषण झाले.सार्वजनिक स्वच्छता, महापालिका रुग्णालयातील गैरसोयी, अनियमित व अपुरा पाणीपुरवठा, वाहतूककोंडी, बीआरटी, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार, प्रदूषण अशा विषयांवरील बातम्या, लेख, छायाचित्रे यांचा प्रदर्शनात समावेश आहे. मंगळवारपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. (प्रतिनिधी)