शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीमुळे शहरच ‘गॅस’वर

By admin | Updated: February 12, 2016 03:39 IST

शहरामध्ये गॅसपाइपलाइन टाकलेल्या ठिकाणी योग्य ती खबरदारी न घेता निष्काळजीपणे खोदाई होत असल्यामुळे गॅसपाइपलाइनला धक्का लागून गॅसगळती होण्याच्या घटना वारंवार

पुणे : शहरामध्ये गॅसपाइपलाइन टाकलेल्या ठिकाणी योग्य ती खबरदारी न घेता निष्काळजीपणे खोदाई होत असल्यामुळे गॅसपाइपलाइनला धक्का लागून गॅसगळती होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अग्निशमन दल व गॅस कंपनीचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून गॅसगळती रोखत असले, तरी या चुकांमध्ये सुधारणा न झाल्यास गॅसपाइपलाइनच्या मोठ्या स्फोटाला शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.मॉडेल कॉलनीमधील कॅनॉल रस्त्याजवळ रस्त्याचे काम सुरू असताना गॅसपाइपलाइनला धक्का लागून गुरुवारी गॅसगळती सुरू झाली. त्यानंतर अग्निशमन दल व एमएनजीएल कंपनीच्या पथकाने येऊन गॅसगळती रोखली. गेल्या काही दिवसांपासून मॉडेल कॉलनीमध्ये गॅसपाइपलाइन फुटून गॅसगळती होण्याचे प्रकार सतत घडत आहेत. गॅसपाइलाइनबाबत कडक निर्देश ठरवून दिले असतानाही या घटना घडत असल्याने त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गॅसगळती सुरू झाल्यानंतर चुकूनही आगीशी संपर्क झाला, मोबाइल बोलणे, स्विच आॅन-आॅफ होणे अशा कृतीतून स्पार्क झाला, तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीकडून मॉडेल कॉलनी परिसरामध्ये गॅसपाइपलाइन टाकण्यात आली आहे. घरांना पाइपलाइनमधून गॅसचा पुरवठा केला जात आहे. गॅसपाइपलाइन टाकण्याचे निकष ठरवून देण्यात आले आहेत. रस्त्यापासून किमान एक मीटर खोल गॅसपाइपलाइन टाकणे बंधनकारक आहे. गॅस पाइपलाइनच्यावर वॉर्निंग मॅट टाकली जाणे आवश्यक असते. त्याचबरोबर पाइपलाइन गेलेल्या जागेवर गॅसपाइपलाइन गेल्याच्या खुणेचे दगड लावणेही बंधनकारक आहे. संबंधित ठिकाणी खोदाई करताना एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना त्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. गॅसपाइपलाइनला धक्का पोहोचू नये म्हणून इतक्या प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, तरीही गॅसपाइपलाइनच्या ठिकाणी खोदाई करताना धक्का पोहोचून वारंवार गॅसगळती होण्याच्या घटना घडत आहेत.अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, की गॅसगळतीचा कॉल आल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कूलिंगचे काम सुरू करतो. मात्र, गॅस कंपनीचे पथक आल्याशिवाय गॅसगळती थांबविता येत नाही. त्याकरिता त्या पाइपलाइनमधून होणारा गॅसपुरवठा थांबविणे आवश्यक असते. संबंधित कंपन्यांनी ठरलेल्या निकषाप्रमाणे गॅसपाइपलाइन रस्त्यापासून खोलवर टाकणे आवश्यक आहे.गॅसपाइपलाइनच्या ठिकाणी खोदाई करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून योग्य ती खबरदारी न घेतली गेल्यामुळे या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक राजू पवार यांनी केला आहे.समन्वयाचा अभावगॅसपाइपलाइनच्या ठिकाणी रस्ता, ड्रेनेजलाइन व इतर कारणांसाठी खोदाई करावयाची असल्यास एमएनजीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन ती करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेकडून एमएनजीएल कंपनीशी समन्वय न साधताच कामे केली जात असल्याने गॅसगळतीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. गॅसपाइपलाइनच्या ठिकाणी जेसीबीने खोदाई करण्याऐवजी ती कामगारांमार्फत काळजीपूर्वक खोदाईची कामे केली जाणे आवश्यक आहे.जीव धोक्यात घालून रोखावी लागते दुर्घटनाअग्निशमन दलास गॅसगळतीचा कॉल आल्यानंतर त्यांचे जवान तातडीने घटनास्थळी धाव घेतात. घटनास्थळापासून नागरिकांना दूर जाण्याचे आवाहन करून, तसेच वाहतूक थांबवून कूलिंगचे काम त्यांच्याकडून केले जाते. मात्र, गॅसपाइपलाइनचा पुरवठा बंद करून त्याची दुरूस्ती करण्याचे काम एमएनजीएलचे पथक आल्याशिवाय करता येत नाही. त्यामुळे एमएनजीएलचे पथक येईपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांना जीव धोक्यात घालून घटनास्थळी कूलिंगचे काम करीत थांबून राहावे लागते.२०० किमीचे काम पूर्ण, १ हजार किमी प्रस्तावितशहरामध्ये एमएनजीएलकडून गॅसपाइपलाइन टाकण्याचे २०० किमी पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. आणखी एक हजार किमीपर्यंतची गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात गॅसपाइपलाइनचे जाळे शहरात निर्माण झाल्यानंतर खूपच सावधगिरीने खोदाईची कामे करावी लागणार आहेत. शहरात निष्काळजीपणाने खोदाईची कामे केली जात असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. असे असताना आणखी १ हजार किमी गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम प्रस्तावित आहे.पाइपलाइन चुकून फुटली गॅसपाइपलाइन असलेल्या ठिकाणी खोदाई करताना महापालिका प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाते. मॉडेल कॉलनीमध्ये रस्त्याचे काम सुरू असताना चुकून गॅसपाइपलाइनला धक्का लागून गळती सुरू झाली.’ - राजेंद्र राऊत, पथ विभागप्रमुख