शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

शहरात उन्हाळी शिबिरांचे फुटले पेव

By admin | Updated: April 25, 2015 05:10 IST

सध्या शहराच्या विविध भागांत अभिनय- नाट्य, क्रीडा, कला अशा वेगवेगळ्या शिबिरांचे मोठे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत.

अमोल जायभाये, पिंपरीसध्या शहराच्या विविध भागांत अभिनय- नाट्य, क्रीडा, कला अशा वेगवेगळ्या शिबिरांचे मोठे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहेत. शहरात सध्या उन्हाळी शिबिरांचे पेव फुटले आहे. शिबिराचे आयोजन करण्यासाठी लागणारे प्रशिक्षक, प्रशिक्षित व्यक्तींची कमतरता असल्याने मुलांना कोणाकडे आणि कसे पाठवायचे, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे. शहरामध्ये उन्हाळी शिबिरांचे फॅ ड मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. शाळेला सुट्टी लागताच शिबिराच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकण्याकडे कल वाढत आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये किंवा शहरातील वेगवेगळ्या भागात या उन्हाळी शिबिरांचा बोजवारा झाला आहे. त्यामध्ये काय शिकवले जाते आणि कोण शिकवते, याकडे लक्ष नसल्यामुळे मुलांचा विकास होण्याऐवजी नुकसानच होत आहे. उन्हाळी शिबिरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नोकरीमुळे मुलांना वेळ देऊ न शकणाऱ्या पालकांमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी शिबिराला पाठवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळी शिबिराचा दर्जा घसरत चालला आहे. पाच ते सहा दिवसांच्या शिबिरातून काय सिद्ध होणार, हे माहितीच नसते. अनेक प्रकारची शिबिरे असतात. त्या शिबिरांचे शुल्क ही ३००० रुपयांपासून १०,०००पर्यंत व त्यापेक्षाही जास्त आहेत. त्यांचे आयोजन एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत करण्यात येते. यामध्ये क्रीडा शिबिरे, डान्स शिबिरे, साहसी खेळ, कला, जंगल सफरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिबिरांचे आयोजन केले जात आहे. मात्र, शिबिरांचे आयोजन करताना त्यातील प्रशिक्षकांच्या गुणकौशल्यांची माहिती घेतली जात नाही. अनेक शिबिरे असे आहेत, की तेथे दोन-तीन तासच मुलांना शिकवले जाते. शिबिरातील प्रमुख शिक्षक राज्यस्तरावर किंवा इतर ठिकाणी झळकलेले असतात. त्यांच्या नावावर शिबिरे भरवली जातात. मात्र, प्रत्यक्षात मुलांना शिकवण्यासाठी दुसरेच प्रशिक्षक मानधनावर घेतलेले असतात. त्यामुळे मुलांना प्रशिक्षकांचा काहीच फायदा होत नाही वा त्यांच्याकडून काही शिकायलाही मिळत नाही. शिबिराचे आयोजन करताना त्यांची व्यवस्थित माहिती घेतलेली नसते. त्यासाठी अधिकृत मार्गदर्शक नसतो. त्यामुळे मुलांना काहीच शिकायला मिळत नाही. शिबिरामध्ये मुलांवर संस्कार व्हायला हवेत. त्यामध्ये चांगल्या प्रशिक्षकांच्या हाताखाली त्या-त्या क्षेत्रातील बारीक सारीक गोष्टींची माहिती मिळाली पाहिजे. त्यामध्ये करिअर करण्यासाठी त्याचा काही उपयोग होणे गरजेचे असते. शिबिरामध्ये विद्यार्थी किती असावेत, याची मर्यादा नसते. जितके प्रवेश मिळतील, त्या प्रमाणात विद्यार्थी असतात. त्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष देता येत नाही वा त्यांना कोणत्याही गोष्टी शिकवता येत नाहीत. शिबिरामध्ये प्रवेश घेताना पालकांना मुलांनी काही ना काही तरी शिकावे. त्याचा फायदा अभ्यासात आणि कलागुणांमध्ये दिसावा, यासाठी ते पैसे भरत असतात. मात्र, त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे.