शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

तळजाईच्या ‘त्या’ इमारतीत नागरिकांचा रहिवास

By admin | Updated: November 5, 2014 05:26 IST

तळजाई येथील इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर परिसरातील अनधिकृत इमारतींचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

पुणे : तळजाई येथील इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर परिसरातील अनधिकृत इमारतींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १४ इमारती अतिधोकादायक असल्याचे स्ट्रक्टरल इंजिनिअरच्या पाहणीत आढळून आले होते. त्या इमारतींच्या मालकांना महापालिकेच्या बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यावे, अन्यथा इमारती मोकळ््या करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, इमारतीच्या मालकांनी नोटीसला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या असून, जीव मुठीत घेऊन या इमारतीत नागरिक रहिवास करीत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या हद्दीत सप्टेंबर २०१२ मध्ये तळजाई येथे चार मजली इमारत कोसळून १२ जणांचा जीव गेला होता. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने तळजाई, आंबेगाव पठार व धनकवडी परिसरातील अनधिकृत बांधकामांचे सर्व्हेक्षण करण्याचे काम स्ट्रक्चरल इंजिनिअर धैर्यशील खैरे पाटील यांच्या संस्थेला दिले होते. त्या वेळी खैर पाटील यांच्यासह तज्ज्ञांच्या समितीने महापालिकेच्या सहकार्याने इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या वेळी २३ इमारती धोकादायक आढळून आल्या होत्या. यात १४ इमारती अतिधोकादायक असून, त्यानुसार पालिकेला प्राथमिक अहवाल डिसेंबर २०१२पर्यंत सादर करण्यात आला. दरम्यान, बांधकाम निरीक्षकांनी धोकादायक बांधकामाच्या मालकांना नोटीस दिल्या होत्या. महापालिकेकडे स्ट्रक्चरल इंजिनिअरची यंत्रणा नसल्याने संबंधितांनी खासगी संस्थेकडून स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यावे. अन्यथा धोकादायक इमारतीमध्ये रहिवास न करता, त्या मोकळ््या कराव्यात, अशी नोटीस बजावण्याचे सोपस्कर अधिकाऱ्यांनी केले. मात्र, अवघ्या तीन इमारतीच्या मालकांनीच स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल सादर केला आहे. उर्वरित इमारतींच्या मालकांनी नोटीसला उत्तरही दिलेले नाही. प्रत्यक्षात त्या धोकादायक इमारतींमध्ये मालक राहत नसून, भाडेकरी राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यांना संबंधित इमारती धोकादायक असल्याचा कोणताही पत्ता नाही. महापालिका अधिकाऱ्यांनी त्या इमारतींना नोटिसांचे सोपस्कर पूर्ण करून पुढील कार्यवाहीकडे दुर्लक्ष केले आहे. ०