शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना संताप अनावर, एटीएमची केली तोडफोड

By admin | Updated: April 10, 2017 16:35 IST

केंद्र शासनाने 8 नोव्हेंबरला रात्री आठ वाजता जुन्या पाचशे, हजाराच्या नोटा चलनात रद्द केल्याची घोषणा केली.

ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 10 - केंद्र शासनाने 8 नोव्हेंबरला रात्री आठ वाजता जुन्या पाचशे, हजाराच्या नोटा चलनात रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर नोटा बदलून घेणे, बँकेतून मर्यादित रक्कम काढणे अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागले. देशातील काळा पैसा बाहेर येईल. या उद्देशाने नागरिकांनी गैरसोर्इंशी सामना केला. होणारा त्रास संयमाने सहन केला. पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही एटीएममध्ये खडखडाट जाणवू लागल्याने संतप्त नागरिकांनी सांगवीतील बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएम मशिनची तोडफोड केली. केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. घरात लग्न कार्य असताना, स्वत:च्या खात्यातून गरजेपुरती रक्कमही काढता येत नव्हती. रुग्णालयाचे बिल अदा करण्यास अडचणी आल्या. रांगेत उभे राहून कधी चार हजार तर कधी दोनच हजार रुपये मिळत होते. अशा सर्व अडचणी येत असताना सरकारने घेतलेला निर्णय हा नागरिकांच्या हिताचा असणार या उद्देशाने नागरिकांनी बँक व्यवहारावेळी होणारा सर्व त्रास सहन केला. नोटाबंदीनंतरची ही अडचणीची परिस्थिती कधीच दूर झाली आहे. आता केवळ बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या निष्काळजीपणानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. शनिवार, रविवार बँकांचे कामकाज बंद त्यामुळे नागरिक सोमवारचा दिवस उजाडण्याची प्रतीक्षा करीत होते. शनिवार, रविवार दोन्ही दिवस एटीएममध्ये खडखडाट होताच, सोमवारीसुद्धा एटीएममध्ये खडखडाट जाणवल्याने संतप्त नागरिकांनी अक्षरश: सांगवीतील एटीएम मशिनची तोडफोड केली. एटीएमची तोडफोड करून जमाव निघून गेल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली, त्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. जमलेल्या नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.