शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना पडला पाणीटंचाईचा विसर

By admin | Updated: March 5, 2016 00:51 IST

पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे प्रमाण गेल्या ३ महिन्यांत खूपच कमी झाले आहे

पुणे : पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे प्रमाण गेल्या ३ महिन्यांत खूपच कमी झाले आहे. गेल्या ३ महिन्यांत केवळ ५३ तक्रारी या हेल्पलाइनवर करण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात हेल्पलाइन सुरू झाल्यानंतर तक्रारींचा सुरू झालेला ओघ कमी झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी, बांधकामासाठी वापरले जात असल्यास, पाण्याची पाइपलाइन फुटल्याचे दिसून आल्यास, पाण्याच्या टाक्या भरून वाहत असल्यास महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांक ०२०- २५५०१३८३/२५५०१३८६ या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या तक्रारींची शहानिशा करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना कुणाल कुमार यांनी केल्या होत्या. पाण्याच्या तक्रारींसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर सुरुवातीला तक्रारींचा मोठा पाऊस पडला. त्याची शहानिशा करून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून या हेल्पलाइनवर येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. डिसेंबर २०१५ मध्ये १५, जानेवारी २०१६ मध्ये २१, तर फेब्रुवारी २०१६ मध्ये केवळ १७ तक्रारी या हेल्पलाइन क्रमांकावर नागरिकांनी नोंदविल्या आहेत.महापालिकेच्या वतीने पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात अजूनही अनेक ठिकाणी वॉशिंग सेंटर सुरू आहेत. जलतरण तलावही बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते, मात्र जलतरण तलाव चालविणाऱ्या ठेकेदारांनी त्यामध्ये सवलत मिळवून ते चालूच ठेवले आहेत. (प्रतिनिधी)