शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाइल पाठलाग; ३ दरोडेखोरांना अटक

By admin | Updated: September 4, 2016 04:06 IST

जीव धोक्यात घालून चाकण पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून ३ दरोडेखोरांना जेरबंद केल्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक

चाकण : जीव धोक्यात घालून चाकण पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून ३ दरोडेखोरांना जेरबंद केल्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप व त्यांच्या पथकाला दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.याबाबतची अधिक माहिती अशी : मागील चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने भोसे येथे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचालकाला हटकले असता आरोपींनी गाडी वेगाने चालू करून पसार झाले. त्यांच्या मागे सरकारी बोलेरो गाडीतून पोलीस पथकाने आळंदी फाट्यापर्यंत पाठलाग केला, परंतु स्पायसर चौकाजवळ दोन गाड्यांमध्ये मोठे अंतर पडल्याने आरोपी फरार झाले.त्यानंतर गुरुवारी (दि. १) रात्री एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा तीच काळ्या रंगाची व बम्परला सिल्व्हर रंग असलेली स्कॉर्पिओ तळेगाव चौकात उभी असताना रात्रीच्या गस्तीवरील पोलीस अशोक साळुंके यांनी त्यांना हटकले असता आरोपींनी गाडीसह पळ काढला. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी अलर्ट होऊन पोलीस शेखर हगवणे, अशोक साळुंके, राऊत व दोन पोलीसमित्रांना घेऊन सरकारी गाडीतून सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. आरोपी मुंबईकडे पळून जात असताना तळेगाव पोलिसांना अलर्ट करण्यात आले. आरोपी पुन्हा मागे फिरले. चाकण पोलिसांनी भंडारा डोंगराजवळील बंद पडलेल्या टोलनाक्यावर नाकाबंदी केली. आरोपी १२० च्या स्पीडने पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी एमआयडीसीतील हॉटेल मॅरिएट चौकात नाकाबंदी केली. नाकाबंदी पाहून आरोपी १०० मीटर मागे वळले व पुन्हा १२० च्या स्पीडने मागे फिरले. परंतु गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी जागेवर गोल फिरून बंद पडली. हे दरोडेखोर एटीएम दरोड्यातील असल्याने पीएसआय श्रीधर जगताप यांनी सावधानता बाळगून आरोपींवर पिस्तूल रोखले व आरोपींना काचा फोडून गाडीतून बाहेर काढून त्यांच्या मुसक्या आवळल्या. राजेश भगवान पवार (वय ३६, रा. माझेरी, ता. महाड, जि. रायगड), राजेश आवळे (वय ३७, रा. कोपरखैरणे), मोहम्मद जाफर खावेन (वय २९, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना सहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.