शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दागिने चोरणारा सीसीटीव्हीत कैद

By admin | Updated: January 22, 2016 01:31 IST

येथील सुंदर संकुलमध्ये भर दिवसा सोन्याचे दागिने चोरी करणारा चोरटा स्ीासीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

तळेगाव ढमढेरे : येथील सुंदर संकुलमध्ये भर दिवसा सोन्याचे दागिने चोरी करणारा चोरटा स्ीासीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ज्ञानवर्धिनी विद्यालयासमोरील सुंदर संकुलमध्ये चौथ्या मजल्यावर राहणारे समर रावळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून साधारण ३ ते ४ तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने आज भर दिवसा सकाळी ११ ते ११.४५ वा. दरम्यान चोरून पलायन केले. मात्र, या वेळी इमारतीच्या जिन्यावरून जात असताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. याबाबत समर रावळ यांनी तळेगाव ढमढेरे पोलीस चौकीला फिर्याद दिली आहे. तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर परिसरात फोटोतील सदर व्यक्ती आढळल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस हवालदार शशिकांत बंड यांनी केले आहे.तळेगाव ढमढेरे परिसरात भुरट्या चोरांच्या प्रमाणात वाढ झाली असून, दोनच दिवसांपूर्वी एस.टी. स्टँड चौकात दुकाने फोडून चोरी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तळेगाव ढमढेरे परिसरात वाढत्या शहरीकारणामुळे चोऱ्यांच्या प्रमाणातही वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लॅटसंस्कृतीही वाढल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (वार्ताहर)