शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

चौक्यांची सरंजामशाही संपणार

By admin | Updated: January 19, 2015 01:57 IST

पोलीस चौकीस्तरावर तक्रार घेण्यासाठी होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच दखलपात्र गुन्हे दाखल करून घेतले जाणार आहेत.

पुणे : पोलीस चौकीस्तरावर तक्रार घेण्यासाठी होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच दखलपात्र गुन्हे दाखल करून घेतले जाणार आहेत. भोसरी एमआयडीसीतील एका युवतीच्या छेडछाडीच्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे तिला आत्महत्येचा प्रयत्न करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. या निर्णयामुळे पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसमोर तक्रारदार आपली कैफियत मांडू शकणार आहेत. तसेच, पोलीस चौक्यांच्या सरंजामशाहीलाही चाप बसणार आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनीही असाच निर्णय घेतला होता. त्याला काही प्रमाणात विरोधही झाला होता. परंतु, अनेकदा पोलीस चौकीस्तरावर काय सुरू आहे, याची माहितीच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तसेच, पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी तक्रार घेत असल्यामुळे त्यामधील त्रुटींचा फायदा आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होतो. कायद्यानुसार दखलपात्र गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसमोर होणे बंधनकारक आहे. मात्र, चौकीमधील घडामोडींची माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. अनेकदा शहर पोलीस नियंत्रण कक्षाकडून बीट मार्शलला (गस्त) कळवलेली माहिती पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा सूचना दिल्या. मार्चपर्यंत सीसीटीएनएस यंत्रणेद्वारे कामकाज करायला सुरुवात करावी, असे आदेश असल्यामुळे या निमित्ताने पोलीस ठाणे स्तरावर त्याचाही सराव सुरू होईल.