शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींची निवड बिनविरोध?

By admin | Updated: April 11, 2017 03:33 IST

स्थायी समितीच्या सभापती निवडीनंतर महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांच्या सभापतिपदासाठी

पिंपरी : स्थायी समितीच्या सभापती निवडीनंतर महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांच्या सभापतिपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने एकाच समितीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपा बहुमताच्या जोरावर समिती सभापतींची निवड बिनविरोध करण्याची शक्यता आहे. विधी समिती सभापतिपदासाठी शारदा सोनवणे, तर उपसभापतिपदासाठी अश्विनी जाधव, शहर सुधारणा समिती सभापतिपदासाठी सागर गवळी व उपसभापतिपदासाठी शैलेश मोरे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी सुनीता तापकीर व राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांनी तर उपसभापतिपदासाठी योगिता नागरगोजे, तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतिपदासाठी भाजपाचे लक्ष्मण सस्ते यांनी उमेदवारीअर्ज दाखल केले. विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी उमेदवारीअर्ज सोमवारी दुपारी तीन ते पाचपर्यंत दाखल करण्यात आले. महिला व बालकल्याण समिती वगळता इतर कोणत्याही पक्षाने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला नाही. महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपाकडून चारही जागांवर ज्यांची नावे निश्चित केली जातील, त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जाते. भाजपाकडून अर्ज भरतेवेळी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार उपस्थित होते. विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी शनिवारी निवडणूक होईल. (प्रतिनिधी) स्पष्ट बहुमतामुळे सर्व समित्या भाजपाकडेमहापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सत्तारूढ पक्षनेता या महत्त्वाच्या पदांची निवड झाल्यानंतर आता विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीचे वेध लागले आहेत. महापालिकेत पाच विषय समित्या असून, त्यापैकी स्थायी समिती अध्यक्षपदी सीमा सावळे यांची बिनविरोध निवड झाली. विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असून, बहुमतामुळे या समित्याही भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे.बँकेत पैसे असूनही खोळंबा नोटाबंदी निर्णयानंतर नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. घरात लग्नकार्य असताना स्वत:च्या खात्यातून गरजेपुरती रक्कमही काढता येत नव्हती. रुग्णालयाचे बिल अदा करण्यातही अडचणी येत आहेत. नोटाबंदीला पाच महिने उलटल्यानंतरही अडचणी संपलेल्या नाहीत. बँकेत पैसे असूनही केवळ अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. शनिवार व रविवारी बँकांचे सलग कामकाज बंद असल्यामुळे नागरिक सोमवार उजाडण्याची प्रतीक्षा करीत होते. मात्र, सोमवारीसुद्धा एटीएममध्ये खडखडाट असल्याने नागरिकांचा संयम सुटला.