शहरं
Join us  
Trending Stories
1
हमराज मुव्हीची स्टोरी अन् शिलाँगला निघण्यापूर्वी राजाचे व स्वत:चे केलेले वजन; राजाच्या भावाचा सोनमबाबत मोठा दावा
2
३ राज्यातील ७ जिल्ह्यांना मोदी सरकारचं गिफ्ट; ६४०० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता
3
इंडिया आघाडीला धक्का; बिहार निवडणुकीत AAP ची स्वबळाची घोषणा, सर्व जागांवर लढणार
4
RCB टीम खरेदी करणार का? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "मी रॉयल चॅलेंजर पीत नाही..."
5
Trigrahi Yoga 2025: १५ जून रोजी त्रिग्रही योगात पाच राशींना आर्थिक लाभ तसेच पदोन्नतीची संधी!
6
सुधाकर बडगुजरांची कोंडी! CM फडणवीसांसमोर भाजप आमदार, माजी नगरसेवकांनी मांडली गुन्ह्यांची कुंडली
7
तुम्हालाही याचा त्रास होणार..; लादेनचा उल्लेख करत जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना फटकारले
8
हे आहेत सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले टॉप १० देश, ५ मुस्लीम बहुल देशांचाही समावेश; आफ्रिकेतील हिंदू लोकसंख्येनं चकित केलं 
9
राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....
10
ऑपरेशन सिंदूर: भारताच्या तडाख्यात झाली उद्ध्वस्त, ती ठिकाणे पाकिस्तानने झाकली
11
त्याची मला रुखरुख लागेलच... राज ठाकरेंचे मनसैनिकांना खुले पत्र; आणखी काय म्हणाले?
12
दोन फॉलोअर्स कमी झाले, पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, पोलीसही समजावून सांगून थकले, शेवटी...
13
WTC Final : आधी निर्धाव षटकांचा मारा! मग रबाडानं टाकली डबल विकेट ओव्हर; ख्वाजावर ओढावली ही नामुष्की
14
'बालिका वधू'फेम अविका गौरचा झाला साखरपुडा, खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
15
पाकिस्तानी पत्रकारांनी शाहबाज सरकारला दाखवली जागा, भर पत्रकार परिषदेत केला अर्थमंत्र्यांचा अपमान!
16
Health Tips: ५१ व्या वर्षीही गौर गोपाल दास दिसतात फिट; काय असतो साधूंचा डाएट?
17
लॉस एंजेलिसमध्ये ५ दिवसांपासून निदर्शने सुरू, ट्रम्प यांनी मरीन अन् नॅशनल गार्ड तैनात केले; विरोधाचं नेमकं कारण काय?
18
बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टी वधारले, इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' शेअर्सनी मारली बाजी
19
४४० व्होल्टचा झटका! ना पोल, ना कनेक्शन... ८२ हजारांचं पाठवलं वीज बिल, काय आहे हे प्रकरण?
20
अमेरिकेची डबल खेळी! ट्रम्प प्रशासनाला पाकिस्तान सोपवणार 'खजिना'?; भारतासोबत चीनचीही झोप उडणार

पिरंगुटला सोन्याचे दुकान फोडले

By admin | Updated: February 8, 2016 02:12 IST

पिरंगुट (ता. मुळशी) येथील बसथांबा परिसरात असलेले नागनेश्वर ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान (ता. ६) रोजी रात्री २ च्या सुमारास फोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख २१ हजारांची रक्कम असा सुमारे

पौड : पिरंगुट (ता. मुळशी) येथील बसथांबा परिसरात असलेले नागनेश्वर ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान (ता. ६) रोजी रात्री २ च्या सुमारास फोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख २१ हजारांची रक्कम असा सुमारे ५ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. पिरंगुट बसथांबा परिसरात राठोड बंधू यांचे नागनेश्वर ज्वेलर्स नावाने मागील १५ वर्षांपासून सोन्या-चांदीचे दागिने बनविणे व विकण्याचा व्यवसाय आहे. या दुकानाचा पत्रावरील बाजूने कापून चोरट्यांनी अत्यंत शिताफीने दोरीच्या साह्याने खाली उतरून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर चतुराईने सीसीटीव्ही कॅमेरे वायर कापून बंद केले. दुकानाच्या मागील बाजूस असलेली लोखंडी तिजोरी गॅस कटरच्या साह्याने खोलून त्यातील १६ तोळे सोने, २ कि. चांदीचे दागिने, तसेच २१ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. सदर दुकान पुणे-पौड रस्त्यावर अत्यंत वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर असूनही चोरांनी वरील बाजूचा पत्रा कापून आत प्रवेश केलेला असल्याने ही चोरी सराईत व माहीतगार चोराने केली असावी, असा संशय आहे. विशेष म्हणजे हेच दुकान यापूर्वी दोन वेळा फोडलेले असल्याने दुकानाचे मालक राठोड पुरते धास्तावले आहेत. दुकानाचे मालक राठोड दररोजप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असताना सदर घटना घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी घटनेची खबर पिरंगुट पोलीस चौकीला दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असून, त्यात तोंड रुमालाने बांधलेले दोन चोरटे कॅमेऱ्याची वायर कापण्यापूर्वी दिसून येत आहेत. घटनास्थळी पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक विवेक पानसरे, स्थानिक गुन्हे तपास पथकाचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. (वार्ताहर)