शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांचा जातोय जीव

By admin | Updated: October 4, 2016 01:24 IST

गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये कधी वाहनचालकाची चुकी, तर कधी पालकांचा निष्काळजीपणा बालकांच्या जीवावर बेतला आहे

पिंपरी : गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये कधी वाहनचालकाची चुकी, तर कधी पालकांचा निष्काळजीपणा बालकांच्या जीवावर बेतला आहे. कामातील व्यस्तता, दुर्लक्ष, हलगर्जीपणा यांमुळे शहराच्या विविध भागांत अपघात, दुर्घटना घडल्या असून, चिमुकल्यांना जीव गमावण्याची वेळ आली आहे. सहा महिन्यांत घडलेल्या दहाघटनांतून बोध घेतला, तर अशा घटनांवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ताथवडे येथील ओम शिव कॉलनीत टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात आरती या तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. वडील बिगारी कामासाठी निघाले असता, खाऊचा हट्ट धरून ती वडिलांकडे धावत जात होती. त्या वेळी तेथून जाणाऱ्या टेम्पोची धडक बसली. डोक्याला जबर मार लागल्याने तिचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या ताज्या घटनेमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशीच घटना काही महिन्यांपूर्वी याच भागात घडली होती. घराबाहेर गणपती मंदिराच्या शेडच्या सावलीत झोपवलेले सहा महिन्यांचे बालक चालकाला नजरेस न पडल्याने मोटारीच्या चाकाखाली चिरडले. ही हृदयद्रावक घटना ताथवडे येथील सुखदा कॉलनीत घडली होती. सार्थक असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या त्या चिमुरड्याचे नाव होते. सहा महिन्यांच्या सार्थकला त्याच्या आजीने गणपती मंदिराच्या शेडमध्ये आणले. सार्थकची आई स्वयंपाक करीत होती. आजी बाळाला घेऊन बाहेर आली. तेथे बाळाची आत्यासुद्धा होती. थोड्या वेळाने बाळ झोपी गेले. त्याच्यावर पांघरूण घालून आजी व आत्या दोघी हात धुण्यासाठी घरात गेल्या. त्याचवेळी शेजारीच राहणारा एक जण मोटार बाहेर काढत होता. मोटार मागे घेत असताना, मोटारीच्या मागील चाकाखाली बाळ आले. काही कळण्याच्या आत ते चिरडले गेले.(प्रतिनिधी)