शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही मुलाचा शोध सुरूच

By admin | Updated: May 11, 2017 04:22 IST

गंगापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे डिंभे धरण डाव्या कालव्यात पाय घसरून सिद्धार्थ संतोष वारे (वय ९) हा मुलगा मंगळवारी

लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : गंगापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे डिंभे धरण डाव्या कालव्यात पाय घसरून सिद्धार्थ संतोष वारे (वय ९) हा मुलगा मंगळवारी (दि. ९) पडला आहे. पाटबंधारे विभागाने कालव्याचे पाणी कमी केल्यास त्याचा शोध लागू शकतो, अशी मागणी ग्रामस्थ करीत होते. मात्र कालव्याचे पाणी कमी करता येत नाही, अशी भूमिका पाटबंधारेने घेतल्याने तणाव निर्माण झाला. सायंकाळी उशिरापर्यंत मुलाचा तपास लागला नव्हता.मंगळवारी (दि. ९) दुपारी तीनच्या सुमारास सिद्धार्थ आजी किसाबाई हिच्यासोबत कालव्याच्या कडेला शेळ््या चरण्यासाठी गेला होता. आजी कपडे धूत असताना सिद्धार्थ पाय घसरून पाण्यात पडला. पाण्याला वेग असल्याने तो वाहत गेला. ग्रामस्थांनी मंगळवारी व बुधवारी (दि. ९ व १०) रात्रंदिवस कालव्याच्या कडेला फिरून त्याचा शोध घेतला. मात्र पाण्याच्या वेगामुळे त्याचा तपास लागू शकला नाही. कालव्याचे पाणी कमी केल्यास सिद्धार्थचा शोध लागेल, यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी कमी करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली. यासाठी सुमारे ७० ग्रामस्थांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात येऊन सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांची भेट घेतली. त्यांनी मुलाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू व पाणी कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधू, असे सांगितले. दरम्यान, कालव्याचे पाणी टाकळीहाजी परिसरात सुरू असून येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने येथे पाण्याचे आवर्तन सुरू आहे. हे पाणी बंद केल्यास पुन्हा टाकळीपर्यंत पाणी पोहोचवणे अवघड होईल. त्यामुळे हे पाणी बंद करणे शक्य नाही. तसेच पाण्याचा सर्व निर्णय जिल्हाधिकारी यांच्याकडे असल्याने यासाठी त्यांची परवानगी लागेल, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने मांडली.