शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांच्या मुलांनाही लागलेत ‘आयटी’चे वेध

By admin | Updated: February 3, 2017 03:59 IST

बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे आता साखर कारखानदारीचे अर्थकारण बदलताना दिसत आहे. ‘पॅकेज’च्या युगात साखर कामगारांची मुले आता ‘आयटी’ क्षेत्राकडे वळू लागली आहेत.

- महेश जगताप,  सोमेश्वरनगर बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे आता साखर कारखानदारीचे अर्थकारण बदलताना दिसत आहे. ‘पॅकेज’च्या युगात साखर कामगारांची मुले आता ‘आयटी’ क्षेत्राकडे वळू लागली आहेत. यामुळे भविष्यात साखर कारखानदारीला कुशल कामगारांना मुकावे लागणार असल्याचे सर्वत्र चित्र दिसत आहे. साखर कारखानदारीचा कामगार पिढ्यानपिढ्या कमी पगारात भरडून निघाला आहे. सध्या पॅकेजचे युग चालू असतानाही काही साखर कामगार अजूनही महिन्याला सहा ते सात हजारांवर आपल्या कुटुंबीयांची उपजीविका करताना दिसत आहे. साखर कारखान्यातील कमी पगारामुळे उत्तम शिक्षण घेतलेली मुले साखर कारखान्यांमधील नोकरी डावलताना दिसत आहेत. लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन तिथे काम करण्यास प्राधान्य देत आहेत. साखर कारखान्यात नोकरीची शाश्वती राहिली नाही, दुष्काळ, उसाची कमतरता, साखरेला भाव नसणे अशी कारणे दाखवून साखर कारखाने कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवतात. अनेक सहकारी साखर कारखाने आता मोडीत निघाले आहेत. दोन-दोन वर्षांचे कामगारांचे पगार थकीत आहेत. परिणामी नोकरी सोडून साखर कामगारांच्या कुटुंबाला शेतात अथवा इतर ठिकाणी मजुरी करून आपल्या कुटुंंबाची उपजीविका चालवावी लागत आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणांचा साखर कारखानदारीकडे पाहण्याचा दृष्टिीकोन बदलला आहे. ‘साखर कारखान्यात नोकरी नको रे बाबा’ अशी मानसिकता या तरुण पिढीची झाली आहे. पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी साखर कारखान्यापेक्षा विविध कंपन्यांत चांगले ‘पॅकेज’ तसेच नोकरीची शाश्वती जास्त असते. म्हणूनच आयटीकडे ओढा वाढतो आहे. नवीन पिढी ग्रामीण भागात काम करण्यास तयार नाही, त्यामुळे ते सुरुवातीला केवळ एक दोन वर्षे कारखान्यात अनुभव घेऊन निघून जातात. साखर कारखानदारीत राजकारणच जास्त चालते. (सहकारी आणि खासगी) प्रामाणिकपणे काम करूनदेखील ना पदोन्नती ना पगारवाढ असे म्हणत नवीन शिकाऊ अभियंते केवळ अनुभव घेऊन निघून जात आहेत. कारखान्यात काम करणारे बहुतेक कर्मचारी हे शेती करता येईल म्हणून जवळच्याच कारखान्यात काम करण्यास प्राधान्य देतात, शेती व पगार या दोन्हीवर घर चालवतात. परंतु शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्न व कमी पगार यातून ते प्रगती साधू शकत नाही, म्हणून देखील सध्या नवीन पिढी साखर क्षेत्रात काम करण्यास तयार नाही. सध्या बरेच सहकारी साखर कारखाने बंद पाडले जात आहेत. खासगी साखर कारखाने कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा देत नाहीत, इतर कंपन्यांप्रमाणे सुरक्षा साधने तसेच जादा वेळ काम (ओव्हरटाईम) केल्याचा जादा मोबदला देत नाहीत. बेरोजगारीची कुऱ्हाड कधीही कोसळेल, या कारणांमुळे साखर क्षेत्रात काम करण्यास उच्चशिक्षित तरुण तयार नाहीत. सध्या साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत, असा निव्वळ देखावा केला जात आहे, असे साखर कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांचे म्हणणे आहे. शासनाने जरी १५ टक्के पगारवाढ करण्याचे ठरवले असले, तरी होणारी पगारवाढ ही अत्यंत तुटपुंजी आहे. ही पगारवाढ कामगारांच्या कौटुंबिक गरजा भागविणारी नाही. साखर कारखानदारांनी याचा विचार करावा, अन्यथा भविष्यात साखर कारखान्यांच्या अडचणीत भर पडल्याशिवाय राहणार नाही. या वर्षी उसाच्या कमतरतेमुळे बरेच साखर कारखाने चालू झाले नाहीत त्यामुळे तेथील बरेच अभियंते आणि इतर कामगारांनी वेगळा रस्ता धरला आहे किंवा इतर कारखान्यात काम मिळवले आहे. कारखान्यांनीही वेळीच याकडे लक्ष दिले नाही; तर कारखान्यांना कुशल कामगारांना मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे.