शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिड उडाल्याने मुले जखमी

By admin | Updated: June 16, 2015 00:41 IST

कोथरूड भागातील अविश सोसायटीत बेकायदा शेतीविषयक कीटकनाशक तयार करणारे वीरेंद्र लोमटे यांच्या घरातील अ‍ॅसिड साफसफाई

कोथरूड/कर्वेगनगर : कोथरूड भागातील अविश सोसायटीत बेकायदा शेतीविषयक कीटकनाशक तयार करणारे वीरेंद्र लोमटे यांच्या घरातील अ‍ॅसिड साफसफाई करताना सकाळी सांडल्याने शिवराय शाळेतील मुले जखमी झाली.रोहन चंद्रकांत जाधव, प्रसाद लहू शेडगे, स्वप्निल अप्पासाहेब बनकर, सौरभ अकुंश मालपोटे, अविनाश सिद्धनाथ कदम, स्वप्निल बाळू भिकुले, अभिषेक बाळासाहेब तनपुरे, विशाल अंकुश सकपाळ, अभिजित दाभाडे, अमिर ठोंबरे, आशुतोष कदम अशी जखमी मुलांची नावे आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. वीरेंद्र लोमटे यांनी रहिवासी सोसायटीत बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू केला असून धोकादायक द्रव्यांची साठवण केल्याबद्दल कोथरूड पोलिसांच्या वतीने रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवराय शाळेलगतच्या अविश सोसायटीत वीरेंद्र लोमटे यांच्या घराची साफसफाई सुरू असताना घरातील एका ५ लिटरच्या कॅनमध्ये शिल्लक असलेल्या कृषी औषधे बवनण्यासाठी आणलेल्या अ‍ॅसिडचे कॅन साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून खाली पडले. कॅन खाली पडताच फुटल्याने शाळेच्या आवाराबाहेर असलेल्या मुलांच्या अंगावर अ‍ॅसिडचे शिंंतोडे उडाले. त्यानंतर मुलांना प्रथमिक उपचार देऊन ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र फड तपास करीत आहेत. तीव्रता कमी असली तरी सोसायटीच्या आवारात बेकायदा साठा ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांनी सांगितले. कोथरूड पोलिसांनी चौकशी करावी-अविश सोसायटीत मुलांच्या अंगावर अ‍ॅसिड उडाल्यानंतर लोमटे यांच्या घरातून कोथरूड पोलिसांनी अवैध अ‍ॅसिडचा साठा जप्त केला असून, रहिवासी सोसायटीच्या आवारात बेकायदेशीर व्यवसायाची निरपेक्ष चौकशी करून गुन्हा दाखल करावा. सध्या संबंधित प्लॅटधारकाकडून घर साफ करण्यासाठी अ‍ॅसिड आणल्याची माहिती देण्यात येत असली, तरी त्याबाबत शहनिशा करण्याची गरज आहे. कोणताही प्रक्रिया करण्याचा व्यवसाय करताना आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य निरीक्षकांनी सांगितले.