शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक जखमी

By admin | Updated: November 18, 2014 03:34 IST

घरासमोर खेळत असणाऱ्या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवित बालकाला अक्षरश: काही अंतरापर्यंत फरफटत नेले. नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून बालकाची सुटका केली. मात्र

चिंचवड : घरासमोर खेळत असणाऱ्या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवित बालकाला अक्षरश: काही अंतरापर्यंत फरफटत नेले. नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून बालकाची सुटका केली. मात्र, या घटनेत बालक गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी चिंचवड मधील एसकेफ हैसिंग सोसायटीत घडला. अर्पीत कोदली असे कुत्र्यांच्या हल्लयात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. कोदली कुटुंबिय या सोसायटीतील बी १३ या इमारतीच्या तळ मजल्यावर राहते. दुपारी साडेतीन वाजता अर्पीत सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत खेळत होता. याच वेळी एका भटक्या कुत्र्याने अर्पीतचा चावा घेतला. त्यानंतर इतर तीन कुत्रीही अर्पीतवर धाऊन आली. चवताळलेल्या कुत्र्यांनी त्याला काही अंतरापर्यंत अक्षरश: फरफटत नेले. परिसरातील नागरिकांनी आरडा ओरडा करीत त्याची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. कुत्र्यांच्या हल्लयांत अर्पीतच्या हात, पाय व पाठीवर जखमा झाल्या. उपचारासाठी त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. अर्पीतची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत. या परिसरात अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या सोसायटीच्या मागे असणारया नाल्यामध्ये परिसतातील हॉटेल व्यावसायिक शिल्लक राहिलेले अन्न टाकत असल्याने याभागात कुत्र्यांचा नेहमी वावर असतो. (वार्ताहर)