शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचा लठ्ठपणा गोंडस नव्हे, ठरतो धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:10 IST

गावात कुपोषण, तर शहरांत अतिपोषण लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खेडेगावात कुपोषण वाढत असताना शहरी भागात अतिपोषण ही समस्या ...

गावात कुपोषण, तर शहरांत अतिपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खेडेगावात कुपोषण वाढत असताना शहरी भागात अतिपोषण ही समस्या झाली आहे. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जाता येत नाही. टीव्ही आणि मोबाईलमध्येच मुलांचा खूपसा वेळ जातो. दिवसभर घरी असल्याने सतत जंक फूड, चॉकलेट, थंड पेये, वेफर्स असे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळा, मैदानी खेळ बंद असल्याने व्यायाम थांबला आहे. त्यामुळे लहान मुलांमधील स्थूलता चिंतेचा विषय बनला आहे. स्थूलतेमुळे लहान वयातच मुलांमध्ये अतिरिक्त उष्मांक, कोलेस्टेराॅल, रक्तदाब अशा समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: ८ ते १५ या वयोगटातील मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण जास्त असते.

आहारातून शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. पोषक तत्त्वे कमी प्रमाणात किंवा अतिप्रमाणात मिळाल्यास त्याचा परिणाम शरीराच्या वाढीवर होतो. त्यामुळेच मुलांमध्ये कुपोषण किंवा अतिपोषण होते. मुलांची उंची, वय, वजन यानुसार शरीराची पोषक घटकांची गरज ठरते. त्यामुळे आहारात जास्तीत जास्त नैैसर्गिक पदार्थांचा समावेश असणे आवश्यक असते. पदार्थांमध्ये रंग, रूप, चवीचे वैैविध्य राखल्यास मुले आवडीने पौैष्टिक अन्न खातात.

चौकट

“मैदानी खेळ बंद असले तरी पालकांनी मुलांना घरच्या घरी शारीरिक हालचालींमध्ये गुंतवून ठेवावे. पालकांनी स्वत:च्या आहारातून मुलांसमोर आदर्श घालून द्यावा. निरोगी जीवनशैलीचे महत्त्व लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवावे. पौष्टिक खाद्यपदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेत मुलांना सामावून घ्यावे. मुलांच्या दररोजच्या आहारात पालेभाज्या, कडधान्ये, फळे अशा पदार्थांचा समावेश असावा.”

-डॉ. मिहिर देसाई, बालरोगतज्ज्ञ

चौकट

स्थूलता ही नवी शहरी समस्या

शहरातील कुटुंबांमध्ये बरेचदा आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतात. आर्थिक सुबत्ता असल्याने मुलांचे सर्व हट्ट पालकांकडून पूर्ण केले जातात. मॅगी, चिप्स, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक, पास्ता असे नानाविध पदार्थ हॉटेलमधून आॅर्डर करण्याची क्रेझ लॉकडाऊन काळात बरीच वाढली आहे. पालेभाज्या, फळे पाहून मुले नाक मुरडतात. मुले पूर्ण वेळ घरात असल्याने त्यांचा वेळ चांगला जावा, म्हणून पालक त्यांचे खाण्या-पिण्याचे सर्व हट्ट पुरवतात. त्याची परिणती मुलांचे वजन वाढण्यात होत आहे.

चौकट

“मुलांना जंक फूड, फास्ट फूडचीच चटक लागलेली असते. त्यांना सकस आहाराचे महत्त्व कितीही समजावून सांगितले तरी ऐकून घ्यायला तयार नसतात. हिरव्या भाज्या, कडधान्ये, फळे यांच्या जाहिराती कधीही टीव्हीवर दाखवल्या जात नाहीत. मात्र, तेच पौष्टिक अन्न असते, याकडे मुलांचे लक्ष वेधले पाहिजे. पौष्टिक पदार्थ बनवण्यात मुलांना सहभागी करून घेतल्यास त्यांच्यात सकस आहाराविषयी गोडी निर्माण होऊ शकते.”

- अपर्णा भावे, पालक

चौकट

जिल्ह्यातील कुपोषित बालके

०ते ६ वर्षातील - ३

तीव्र कुपोषित - २८,६२२

मध्यम कुपोषित - ८१, ५७९