पुणे : साडेपाच वर्षांच्या मुलाचा वडिलांनीच लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईनेच कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे.पीडित मुलगा आईवडिलांसह कोंढवा परिसरात राहतो. फिर्यादीच्या पतीला मद्य पिण्याचे व्यसन असल्याने तो दररोज घरी गोंधळ घालत असे. तिचा पती मुलासोबत अश्लील चाळे करत असल्याचे तिने सप्टेंबर २०१४ मध्ये पाहिले होते. त्यावर तिने पतीला खडसावले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा जूून २०१५ मध्येही असाच प्रकार घडला. त्या वेळीही महिलेने त्याला रागावत तेथून मुलाला घेऊन निघून गेली. मात्र, नोव्हेंबर २०१५ मध्ये मुलाने त्याच्या मावशीला या प्रकारांबाबत सांगितले. २०१६ मध्येही त्याने मुलाचा लैंगिक छळ केला.मुलाला मोबाईलमध्ये गेम खेळण्यास देऊन त्यात अश्लील व्हिडिओ दाखवत असे. याबाबत मुलाने त्याच्या आईला सांगितल्यानंतर ही बाब समोर आली.
पित्याकडूनच मुलाचा लैंगिक छळ
By admin | Updated: March 22, 2017 03:33 IST