शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

राज्याच्या मुख्य सचिवांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:09 IST

राज्याच्या मुख्य सचिवांवर शिस्तभंगाची कारवाई करा ‘ब्रेक दि चैन’ चे आदेश इंग्रजीत काढल्याने केली तक्रार बारामतीच्या वकिलांनी मुख्यमंत्री, ...

राज्याच्या मुख्य सचिवांवर

शिस्तभंगाची कारवाई करा

‘ब्रेक दि चैन’ चे आदेश इंग्रजीत

काढल्याने केली तक्रार

बारामतीच्या वकिलांनी

मुख्यमंत्री, राज्यपालांना पाठविले पत्र

बारामती : राज्यात १ एप्रिलपासून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक दि चैन’ चे अनेक आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र, सर्व आदेश इंग्रजीत कोणासाठी आदेश काढले आहेत. हे आदेश काढणाऱ्या मुख्य सचिवांवर शिस्तभंगाची कारवाई झालीच पाहिजे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. त्यामुळे सर्व आदेश ग्रामपंचायतपर्यंत पोहोचले पाहिजेत. तेव्हाच कायदेशीर अंमलबजावणी झाले असे म्हणता येईल, अशी मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषद सदस्य अ‍ॅड. तुषार झेंडे यांनी केली आहे.

या संदर्भातील सर्व आदेश राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहीने इंग्रजी भाषेत काढण्यात आले आहेत. हे सर्व आदेशाचे पालन जनतेने करायचे आहे. मात्र, त्यांचेपर्यंत हे आदेश पोहोचले का, तुम्हाला कसे आदेश मिळाले, सोशल मीडियावर आणि त्याचेच पालन सुरू केल आहे. गावागावांतील/ग्रामपंचायतपर्यंत शासनाने आदेश पोहचविले का, जनतेला इंग्रजी भाषेतील आदेश समजला का, तुम्ही नुसते जाहीर करा पालन आम्ही करतो, ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्षात आदेशच पोहोचला नाही, गावागावांत दवंडी रजिस्टरला नोंद घ्यावी लागते घेतली का, असे सवाल राज्य ग्राहक संरक्षण परिषदेसे सदस्य अ‍ॅड. तुषार झेंडे यांनी केले आहेत.

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ अन्वये दि. २६ जानेवारी, १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा ही देवनागरी लिपीतील मराठी भाषा आहे. याबाबत शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. त्यानुसार अन्वये राज्य शासनाची सर्व कार्यालये यांचेमार्फत सर्वसामान्य जनतेशी करण्यात येणारे सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज मराठी भाषेतून करणे अनिवार्य आहे. त्यानंतर देखील मुख्य सचिवांनी टाळेबंदी आदेश इंगजी भाषेत काढल्याची अ‍ॅड. झेंडे यांची तक्रार आहे.

याबाबत मुख्य सचिवांना योग्य ते आदेश द्यावेत. तसेच शासन परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करून सदरचे आदेश सूचना राजभाषा मराठी भाषेमध्ये काढण्याचे आदेश देण्याची मागणी देखील अ‍ॅड. झेंडे यांनी केली आहे.

——————————————

...त्यांचा मी यथोचित सन्मान करेन

मुख्य सचिवांच्या इंग्रजी भाषेतील आदेशाचे राज्यातील कोणत्याही एका मंत्री महोदयांनी वाचन करून मराठीत अनुवाद करावा. त्यांचा मी यथोचित शाल, श्रीफळ देऊन सन्मान करेन, असे आव्हान अ‍ॅड. झेंडे यांनी दिले आहे.