शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात खंडपीठासाठी मुख्यमंत्री अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 06:14 IST

पुण्यासाठी खंडपीठ देण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी पुण्याला खंडपीठ देण्याचा प्रस्ताव मान्य केल्यास राज्य सरकारकडून खंडपीठासाठी २२ कोटींचा निधी मंजूर करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला शनिवारी दिले.

पुणे : पुण्यासाठी खंडपीठ देण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी पुण्याला खंडपीठ देण्याचा प्रस्ताव मान्य केल्यास राज्य सरकारकडून खंडपीठासाठी २२ कोटींचा निधी मंजूर करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला शनिवारी दिले.कुटुंब न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पुण्यातील ज्येष्ठ वकील आणि पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी फडणवीस यांची भेट घेतली. जिल्हा न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्या चेंबरमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान फडणवीस आणि हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी वकिलांची खंडपीठाबाबतची मागणी ऐकून घेतली. ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन, भास्करराव आव्हाड, हर्षद निंबाळकर, एम. पी. बेंद्रे, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, उपाध्यक्ष हेमंत झंजाड, उपाध्यक्ष संतोष जाधव आदींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी काय आहे, याबद्दलची भूमिका मांडली.खंडपीठासाठी उपलब्ध जागेची माहिती द्यावी, अशी सूचना मुख्य न्यायमूर्तींनी केली होती. ताथवडे येथे १५० एकर जागेपैकी ४० एकर जागा उपलब्ध आहे. ती खंडपीठासाठी द्यावी, असा मुद्दा या वेळी मांडण्यात आला.मुख्यमंत्री फडणवीस यांचा मिस्कील टोलाकुटुंब न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सरकारी असल्यामुळे वकिलांच्या दोन संघटनांच्या अध्यक्षांना खंडपीठाबाबत जाहीर कार्यक्रमात बोलण्यास मनाई होती. त्यामुळे त्यांनी बोलणे टाळले. मात्र, मुख्यमंत्री बोलण्यासाठी उभे राहिले असता उपस्थित वकिलांपैकी काहींनी खंडपीठाबाबत बोला, असे म्हणत लक्ष वेधले. फडणवीस यांनी आपल्या मागणीसाठी येथे मुख्य न्यायमूर्ती असून त्यांच्याकडे योग्य पद्धतीने हा विषय मांडा, असा मिस्कील टोला लगावून पुढील भाषण सुरू केले. खंडपीठ मागणीचा चेंडू मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टात टोलवल्यामुळे वकीलवर्गही शांत झाला.