शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यावर चिकनगुन्याचे सावट

By admin | Updated: February 14, 2016 03:20 IST

गेल्या तीन वर्षांपासून पुण्याला वेठीस धरणाऱ्या डेंगीपाठोपाठ यंदा शहरावर चिकनगुन्या या संसर्गजन्य आजाराचे सावट घोंगावू लागले आहे. गेल्या दीड महिन्यात शहरात ८० जणांना

पुणे : गेल्या तीन वर्षांपासून पुण्याला वेठीस धरणाऱ्या डेंगीपाठोपाठ यंदा शहरावर चिकनगुन्या या संसर्गजन्य आजाराचे सावट घोंगावू लागले आहे. गेल्या दीड महिन्यात शहरात ८० जणांना या आजाराची लागण झाल्याचे दिसून आले आहे. आता शहरात डासांचा प्रादुर्भाववाढत असल्याने आणि हा आजार डासांच्या मार्फतच पसरत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची भीती आहे.गेल्या काही वर्षांपासून शहरात डासांचा प्रादूर्भाव सातत्याने वाढताना दिसून येत आहे. पावसाळयानंतर प्रामुख्याने आॅक्टोबरपासून ते मे महिन्यापर्यंत शहरात डासांचा प्रादूर्भाव होत असतो. डासांमधून डेंगी, मलेरिया आणि चिकनगुन्या हे आजार पसरतात. पाच वर्षांपूर्वी पुण्यासह राज्यात मलेरियाचा मोठा प्रादूर्भाव होता. मात्र पालिकेले केलेल्या उपाययोजनांमुळे मलेरियाचे रुग्ण घटले पण डेंगीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली. गेल्या ३ वर्षांपासून सातत्याने डेंगीचा पुण्यात उद्रेक होत असल्याचे चित्र आहे. यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. गेल्यावर्षी डेंगीची लागण झालेले एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. तर चिकनगुन्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पूर्ण वर्षभरात अवघी १५ इतकीच होती. पण या वर्षीच्या सुरूवातीपासून शहरात चिकनगुन्याचे रुग्ण सापडू लागले आहेत.जानेवारी महिन्यात शहरात चिकनगुन्याची लागण झालेले तब्बल ६८ रुग्ण सापडले. तर दि. १ ते १३ फेब्रुवारी या काळात चिकनगुन्याची लागण झालेले १२ रुग्ण सापडले आहेत. त्या तुलनेत यंदा डेंगीची लागण झालेले ३० रुग्ण सापडले. मलेरियाची लागण झालेले ३ रुग्ण शहरात सापडले आहेत.(प्रतिनिधी)