शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारांचे रासायनिक पाणी गटारांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:55 IST

पावसाळा सुरू होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. मात्र महाड औद्योगिक वसाहतीमधील उघडे प्लॉट आणि गटारे रंगीबेरंगी झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : पावसाळा सुरू होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. मात्र महाड औद्योगिक वसाहतीमधील उघडे प्लॉट आणि गटारे रंगीबेरंगी झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. नालेसफाई न झाल्याने आता गटारांतील रसायनमिश्रित सांडपाणी रस्त्यावरच येवू लागले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळा सुरू झाला की महाड एमआयडीसी परिसरातील अनेक कारखान्यांमधून घातक रासायनिक सांडपाणी गटारांमध्ये, नाल्यांमध्ये सोडण्यात येते. यंदा देखील अशीच परिस्थिती या महाड औद्योगिक वसाहत औद्योगिक वसाहतीची झाली आहे. सुरुवातीच्या थोड्या लागणाऱ्या पावसामध्ये संपूर्ण महाड औद्योगिक वसाहत क्षेत्र रंगीबेरंगी झाली आहे. दरवर्षी मात्र गटारांमध्ये सोडण्यात येणारे पाणी सरळ सरळ वाहत थेट नदीला मिसळते. यंदा मात्र महाराष्टÑ औद्योगिक वसाहत महामंडळाकडून अद्याप या परिसरातील गटारांची साफसफाई न झाल्यामुळे हे सोडण्यात येणारे गटारातील रासायनिक सांडपाणी गटारांमध्येच तुंबून राहिले आहे, तर मोठ्या पावसात हे सांडपाणी रस्त्यावरच येत आहे. काही उघड्या प्लॉटमध्येही साचल्याचे दिसून येत आहे. सध्या रस्त्यावर येणाºया तसेच गटारांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे औद्योगिक परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. तर या गटारांमध्ये तुंबलेले घातक रसायन पाण्यामुळे परिसरातून नागरिक तसेच कामगारवर्गाला याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत असून आरोग्यास धोकादायक बनला आहे.महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने बंद अवस्थेत आहे. कारखान्यांमध्ये पडलेले किंवा जुना स्टॉक असलेली पावडर किंवा रसायन पावसाच्या पाण्याबरोबरच वाहून येते. तर अनेकदा छोट्या कारखान्यांतून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येते.महाड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या मागच्या बाजूस असलेल्या उघड्या जागेमध्ये पावसापूर्वीच केमिकल पाणी दिसत होते. पावसामुळे या प्लॉटला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून संपूर्ण प्लॉट पांढºया रंगाच्या रासायनिक पाण्याने भरला आहे. त्याचबरोबर सानिक, शेट्ये, मल्लक, निंबुस, सुदर्शन अशा इतर अनेक कारखान्यांसमोर गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक पाणी तुंबले आहे. सुदर्शन कारखान्यासमोरील गटारामध्ये गेली दोन महिन्यापासूनच सांडपाणी साचले आहे.हेच रासायनिक पाणी पुढे सावित्री नदीत मिसळते. त्यामुळे नदीलगतच्या गावांना दूषित पाणी मिळत आहे. औद्योगिक वसाहतीतील झालेल्या या अवस्थेबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळ असो किंवा महाराष्टÑ औद्योगिक वसाहत महामंडळ असो याबद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच औद्योगिक वसाहत क्षेत्राच्या गटारांची साफसफाई महाराष्टÑ औद्योगिक महामंडळाकडून होणे गरजेची होती. मात्र त्यांचेकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वीचे काढायचे टेंडर ऐन पावसाळ्यात काढण्यात आल्याची माहिती महाराष्टÑ औद्योगिक महामंडळाच्या सूत्राकडून देण्यात आली आहे.>बदल्यांचा फटकामहाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बहुतेक अधिकाºयांच्या बदल्या झाल्या झाल्या आहेत. नवीन येणारे अधिकारी यांना मात्र या परिसराची माहिती कमी असते. सध्या नवीन आलेल्या अधिकाºयांचा गैरफायदा घेत महाड औद्योगिक क्षेत्रात हा उद्योग पाणी सोडण्याचा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी येणाºया अधिकाºयांनी लवकरच या परिसराची पाहणी करून या कारखानदारांना लगाम लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.