शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराची होणार तपासणी

By admin | Updated: December 7, 2014 00:22 IST

पालिकेच्या शाळांतील शालेय पोषण आहाराच्या तपासणीसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर स्वतंत्र तपासणी पथके स्थापन करण्यात येणार आहेत.

पुणो : पालिकेच्या शाळांतील शालेय पोषण आहाराच्या तपासणीसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर स्वतंत्र तपासणी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. ही पथके आठवडय़ातून एकदा या आहार, तसेच ते पुरविणा:या संस्थांच्या कामाचीही तपासणी करणार आहेत. 
याबाबत पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी तातडीचे आदेश देऊन याबाबतचे पत्र सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सायंकाळी उशिरा पाठविण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मंगळवार पेठेतील रवींद्रनाथ टागोर शाळेत माध्यान्ह भोजनातून सुमारे 65 मुलांना विषबाधा झाल्यानंतर पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला. भविष्यात अशा प्रकारांवर त्यामुळे आळा बसण्यास मदत होणार आहे.
टागोर शाळेत गुरुवारी दुपारी चौथी ते सातवीच्या 85 मुलांना माध्यान्ह भोजन दिल्यानंतर त्यातील 65 मुलांना चक्कर, उलटय़ा, तसेच जुलाबाचा त्रस झाला. त्यातील 19 मुलांना जास्त त्रस होत असल्याने या मुलांना पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या घटनेमुळे पोषण आहाराच्या दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे यापुढे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर स्वतंत्र तपासणी समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्या पुढील आठवडय़ात स्थापन करण्यात  येणार असून, त्यांच्याद्वारे तत्काळ तपासणीचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिली. (प्रतिनिधी)
 
अशी असेल समिती 
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्थापन करण्यात येणा:या या समितीत सहायक महापालिका आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, सहायक शिक्षणप्रमुख, नागरवस्ती विभागाचा समाजसेवक असणार आहेत. ही समिती पालिकेच्या शाळांमध्ये आहार पुरविणा:या 15 सेंट्रल किचनची दर आठवडय़ास तपासणी करेल. याशिवाय या आहारात वापरले जाणारे धान्य, किचनची स्थिती, आहारासाठी वापरली जाणारी भांडी, वाहतूक केली जाणारी भांडी, आहार मुलांना देताना, तसेच बनविताना पाळले जाणारे स्वच्छतेचे निकष यांची तपासणी करेल. तसेच या तपासणीचा अहवाल प्रत्येक महिन्यास महापालिका आयुक्त, तसेच अतिरिक्त आयुक्त यांना दर महिन्यास सादर करेल.