शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

चेक पोस्ट केवळ नावापुरते!

By admin | Updated: February 11, 2017 02:30 IST

निवडणूक कालावधीत शहरात येणाऱ्या संशयित वाहनांवर नजर ठेवण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत

पिंपरी : निवडणूक कालावधीत शहरात येणाऱ्या संशयित वाहनांवर नजर ठेवण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणाहून अनेक वाहने ये-जा करीत असतानाही दुपारच्या काळात तपासणी केली जात नसल्याचे दिसून आले. काही चेक पोस्ट, तर अडगळीच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. त्यामुळे हे चेक पोस्ट केवळ नावापुरतेच उरले असल्याचे दिसून येत आहेत. महापालिका निवडणूक विभागाची आचारसंहिता लागू आहे. निवडणूक कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी नियोजन केले जात आहे. संशयित वाहनांवर करडी नजर राहण्यासाठी शहरात ठिकठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. यातील काही चेक पोस्टची लोकमत प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली. तीन जणांचे पथकशांततेत मतदानप्रक्रिया पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभागाकडून नियोजन केले जात आहे. यामध्ये शहरात येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. चेक पोस्टवर तीन जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी, निवडणूक विभागाचे कर्मचारी, तसेच व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. तपासणी केल्या जाणाऱ्या वाहनांचे चित्रीकरणदेखील केले जात आहे. रात्रपाळी आणि दिवसपाळीमध्ये पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. संशयास्पद वस्तूंची तपासणी संशयित वाहन आढळल्यास अशा वाहनांची कसून तपासणी करणे, वाहनात काही संशयित वस्तू आढळल्यास कोठून आणली आहे, कोठे घेऊन जाणार आहे याबाबतची खात्री करणे. वाहनांतील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास त्यांच्याकडेही कसून चौकशी करणे गरजेचे आहे. निगडीनिगडीतील भक्ती-शक्ती चौक, किवळेतील मुकाई चौक, मोशी टोल नाका, तळवडेतील आयटी पार्क चौक, वाकड आदी ठिकाणी हे नाके उभारले आहेत. येथे निवडणूक विभागाचे कर्मचारी यासह पोलीस कर्मचारी तैनात आहेत. वाहन तपासताना त्याचे चित्रीकरणही केले जात आहे. मात्र, काही ठिकाणचे चेक पोस्ट लवकर लक्षातही येत नाहीत. चेक पोस्ट आहेत की नाहीत अशी स्थिती आहे. किवळे किवळेतील मुकाई चौकातील चेक पोस्ट बस टर्मिनलच्या आतमध्ये उभारण्यात आला आहे. येथेच कर्मचारयांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी वाहने नजरेसदेखील पडत नाहीत. अशा परिस्थितीत वाहनांची तपासणी कशी होणार असा मुद्दा उपस्थित होत आहे. वाहने येतात आणि जातात; मात्र त्याकडे लक्ष देता येत नाही.वाकड वाकड चौकातील चेक पोस्टवरही अशीच स्थिती होती. रस्त्यावर चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. या ठिकाणी दोन कर्मचारी बसून होते. तेथून ये-जा करणारी वाहने जात होती. मात्र, त्याकडे फारसे लक्ष नसल्याचे दिसून आले.