शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी शहराच्या प्रवेशद्वारावर चेक पोस्ट

By admin | Updated: January 29, 2017 04:16 IST

महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर चेक पोस्ट उभारण्यात आले असून,

पिंपरी : महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर चेक पोस्ट उभारण्यात आले असून, वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. चार दिवसांत एक हजार वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी २१ फेबु्रवारीला मतदान होत असून, २३ फेबु्रवारीला निकाल लागणार आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक विभागाकडून नियोजन केले जात आहे. पथनाट्य, रॅली, मेळावे आयोजित केले जात आहेत. यासह शांततेत मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. पोलिसांकडून कोम्बिंग आॅपरेशन करण्यासह सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. पिस्तुले जमा केली जात आहेत. यासह कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. शहरात येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी शहराच्या प्रवेशद्वारावर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी तीन जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी, निवडणूक विभागाचे कर्मचारी, तसेच व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. तपासणी केल्या जाणाऱ्या वाहनांचे चित्रीकरणदेखील केले जात आहे. रात्रपाळी आणि दिवसपाळीमध्ये पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक, तळवडेतील आयटी पार्क चौक, रावेत-किवळेमधील मुकाई चौक, काळाखडक भूमकर चौक, मोशी टोल नाका, आळंदी फाटा, वाकड आदी ठिकाणी हे चेक पोस्ट आहेत. संशयित वाहन आढळल्यास अशा वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. वाहनात काही संशयित वस्तू आढळल्यास कोठून आणली आहे, कुठे घेऊन जाणार आहे याबाबतची खात्री केली जात आहे. वाहनांतील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास त्यांच्याकडेही कसून चौकशी केली जात आहे. (प्रतिनिधी)शहराच्या प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी केली जात आहे. २४ ते २७ जानेवारी या कालावधीत शहरातील सात चेक पोस्टवर १ हजार ५० वाहनांची तपासणी करण्यात आली. संशयास्पद हालचाली आढळून आल्यास वाहनांची कसून चौकशी करून कारवाई करणार आहे. - संभाजी ऐवले, नियंत्रण अधिकारी आचारसंहिता कक्षगैरप्रकाराला आळानिवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात असल्याची चर्चा असते. या गोष्टींना आळा बसावा, तसेच असे काही प्रकार होत असल्यास निवडणूक विभागाला कळवावे, याबाबत आवाहन केले जात आहे.