शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 03:14 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून काही जणांची फसवणूक केल्याप्रकरणी विद्यापीठातील दोन कर्मचाऱ्यांसह

लोकमत न्यूज नेटवर्कचतु:शृंगी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून काही जणांची फसवणूक केल्याप्रकरणी विद्यापीठातील दोन कर्मचाऱ्यांसह अन्य एकावर गुन्हा नोंदवून चतु:शृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दत्तात्रय रामचंद्र मोरे आणि विजय रघुनाथ मोरे (नवी सांगवी) अशी आरोपींची नावे आहेत. दिलीप अनुसे (मुंजाबा वस्ती, धानोरी) यांनी याबाबत फिर्याद केली आहे. मे २०१४ पासून आजपर्यंत हा प्रकार झाला.अनुसे हे सेवानिवृत्त जवान आहेत. दत्तात्रय मोरे हा सेवक वसाहतीमध्ये राहत होता. तो विद्यापीठामध्ये सेवेस होता. विजय मोरे हा शिपाई असून दत्तात्रयचा भाऊ आहे.एकाने दत्तात्रय मोरे याच्याशी अनुसे यांची ओळख करून दिल्यानंतर दत्तात्रय मोरे याने क्लार्क पदासाठी भरती होणार असल्याची थाप त्यांना मारली. आपली अधिकाऱ्यांशी ओळख आहे, असे सांगून त्याने अनुसे यांच्या मोठ्या व लहान मुलाला व सुनेला क्लार्कची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्याच्या आमिषाला बळी पडून अनुसे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पैसे देण्यास तयार झाल्यानंतर अनुसे यांच्याकडून सुरुवातीला अ‍ॅडव्हान्स म्हणून २ लाख ७० हजार रुपये देण्याची मागणी केली. नंतर १ लाख आणि तिसऱ्यांदा दीड लाख रुपये घेतले. असे एकूण मिळून ४ लाख ८० हजार रुपये घेण्यात आले. राजभवन येथे शैक्षणिक कागदापत्रांची पडताळणी करण्यासाठी मोरे याने पुन्हा पैशांची मागणी केली. त्यावेळी एका अधिकाऱ्यांशी बोलणे करून देण्याच्या बहाण्याने त्याने विजय मोरे या आपल्या भावास फोन लावून दिला. त्यानेही आपण प्रशासकीय अधिकारी बोलत असल्याचे खोटे सांगून फसवणूक केली.अनेक महिने नोकरी न लावल्याने अनुसे यांनी मोरे याला अनेकदा विचारणा केली, तेव्हा त्याने टाळाटाळ केली. अनुसे यांनी कागदपत्रे मागितली असता मोरे याने पैसे परत करण्याच्या निमित्ताने चेक दिले. ते न वटल्याने अनुसे यांनी त्याला जाब विचारला, त्यावेळी फसवणूक लक्षात आली. मोरे नंतर ६ महिने अनुसे यांना भेटला नाही. दरम्यान, त्याने घेतलेल्या रकमेपैकी १ लाख ५३ हजार रुपये परत दिले. अनुसे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली. यावेळी तसेच निखिल राम लोखंडे (वय २७, अशोकनगर, भोसरी) यांच्यासह इतरांचीही आरोपींनी फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक निरिक्षक संदेश केंजळे तपास करत आहेत.