शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

नोकरीच्या आमिषाने फसवणूक

By admin | Updated: June 27, 2015 03:46 IST

भारत सरकारच्या किसान कॉल सेंटरमध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधिपदाच्या भरतीसाठी आॅनलाईन पद्धतीने मुलाखत घेऊन पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे,

पिंपरी : भारत सरकारच्या किसान कॉल सेंटरमध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधिपदाच्या भरतीसाठी आॅनलाईन पद्धतीने मुलाखत घेऊन पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे, अशा स्वरूपाची जाहिरात एका दैनिकात (‘ लोकमत’ नव्हे) देऊन अनेक जणांची फसवणूक केली आहे. मुलाखतीसाठी ई-मेल पत्त्यावर कागदपत्रे पाठवावीत व बँकेच्या खात्यात ११०० रुपये जमा करावेत. पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला आॅफर लेटर पाठविण्यात येईल, अशा प्रकारची जाहिरात दिली होती. त्यासाठी अनेकांनी नोकरीसाठी अर्ज केले व बँक खात्यात पैसे जमा केले. मात्र, पैसे भरून अनेक दिवस झाल्यानंतरही कोणत्याही स्वरूपाची माहिती दिली गेली नाही. फोन केल्यानंतर कोणत्याही स्वरूपाचा प्रतिसाद संबंधित व्यक्तींनी दिला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे तरुणांच्या लक्षात आले. त्यांनी ‘लोकमत’कडे या संबंधात संपर्क साधला.मुलाखतीसाठी कागदपत्रे पाठवल्यानंतर संबंधित उमेदवारांना एक आॅफर लेटर पाठविण्यात आले. त्यासोबत परत एक बँक खाते क्र मांक पाठवून तुमची निवड झाली आहे. तुम्हाला २५ हजार रुपये पगार दर महिना दिला जाईल. २०४३पर्यंत कंपनीने तुम्हाला करारबद्ध केले आहे, अशा स्वरूपाचे पत्र देण्यात आले. तुम्हाला घरबसल्या काम करता येईल. त्यासाठी दिलेल्या बँक खाते क्रमांकावर लॅपटॉप मिळण्यासाठी १२ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. मात्र, संबंधित तरुणाने ९ हजार ५०० रुपये जमा केले. त्यानंतर परत फोन करून कंपनीने तुम्हाला लॅपटॉप दिला आहे. तो कुरिअर करण्यासाठी १०,००० रुपये भरा, असे सांगण्यात आले. त्यानंतर ते पैसे भरण्यास असमर्थता दाखविली. त्यानंतर पैसे परत मिळावेत, यासाठी पीडित तरुणाने कंपनीच्या क्रमांकावर संपर्क साधला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)