शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

स्वस्तात घरांच्या आमिषाने फसवणूक

By admin | Updated: February 4, 2017 03:57 IST

खेड तालुक्यातील एका गावाच्या गायरान जमिनीवर मोठा गृहप्रकल्प बांधून अगदी स्वस्तात घरे देण्याचे आश्वासन देऊन सामान्यांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार

आंबेठाण : खेड तालुक्यातील एका गावाच्या गायरान जमिनीवर मोठा गृहप्रकल्प बांधून अगदी स्वस्तात घरे देण्याचे आश्वासन देऊन सामान्यांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही महिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार आणल्याने समोर आला आहे. चाकणमधील काही जणांनी एकत्रित होऊन काही बड्या राजकीय नेत्यांची नावे पुढे करून त्यांच्या माध्यमातून संबंधित गायरान जमीन मिळवली. लाखभर रुपयांत हक्काचे घर देण्याचे खोटे आश्वासन देऊन अनेकांकडून प्रत्येकी वीस ते सत्तर हजार रुपयांपर्यंतच्या रकमा उकळण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या संघटनेच्या काही जणांनी हा प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. पैसे घेतल्यानंतरही गेल्या दीड ते दोन वर्षांत प्रत्यक्षात घरे बांधण्याच्यासंदर्भात काहीही हालचाल न दिसल्याने अखेरीस काही महिलांनी थेट पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. फसवणूक करणाऱ्यांपैकी काही जण बेपत्ता झाले आहेत. स्वस्तात घरे देण्याच्या नावाखाली शेकडो नागरिकांचे अर्ज भरून घेण्यात आले होते. संबंधित संस्थेचे सभासदत्व मोफत देण्यात आले व सभासद नोंदणी झाल्यानंतर सर्व सभासदांसाठी एकत्रितपणे शासनाकडून अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी खेड तालुक्यातील एका गावातील गायरान जागेत व पुनर्वसन जागेत घरे बांधण्यासाठी मंजुरी मिळाल्याची माहिती अनेकदा बैठकांमधून देण्यात आली. पडलेल्या अनेकांनी ३० हजारांपासून सत्तर हजार ते एक लाख इतके पैसे संबंधितांकडे रोखीने जमा केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकणमधील खंडोबामाळ भागात राहणाऱ्या सुमारे दहा महिलांनी याबाबत तक्रार अर्ज चाकण पोलीस ठाण्यात दिला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार वेगवेगळ्या संघटनेच्या पाच जणांनी एकत्रित येऊन एक संस्था स्थापन केली. मागील दीड वर्षात प्रत्येकी २० हजार ते एक लाख रुपये रोख स्वरुपात घेण्यात आले. दोन कोटींची फसवणूक?सुरुवातीला तक्रारदार महिलांकडून प्राप्त होत असलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार दीड ते दोन कोटींच्या घरात ही रक्कम असण्याची शक्यता आहे. यातील सर्व व्यवहार रोख स्वरुपात झालेले असल्याने त्याचे पुरावे गोळा केले जात आहेत. संबंधित संस्थेच्या कार्यकर्त्यांची चौकशी सुरू करण्यात येणार आहे. - महेश ढवाणचाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक