शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशाच्या सैन्य दलातील एका बड्या अधिका-याशी ओळख आहे. त्यांच्याआधारे नोकरी लावून देण्याचा बहाणा करून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देशाच्या सैन्य दलातील एका बड्या अधिका-याशी ओळख आहे. त्यांच्याआधारे नोकरी लावून देण्याचा बहाणा करून तरुणाकडून तीस हजार रुपये घेऊन फसवणूक करणा-या एकास स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमित अशोक नलावडे (वय 45, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी राम सुरेश उबाळे (वय 24, रा. चिंचगाव, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. नलावडे याने उबाळे यांना भेटून सांगितले की, त्याची सैन्यातील बड्या अधिका-यांबरोबर ओळख आहे. त्या अधिका-याच्या माध्यमातून तुमची सैन्यात भरती करतो. त्यासाठी वेळोवेळी 30 हजार रुपये घेतले. मात्र नोकरी मिळवून दिली नाही. त्याबाबत विचारणा केली असता टाळाटाळ केली. त्यानंतर जॉयनिंग लेटर देतो असे सांगून फिर्यादी आणि साक्षीदार यांना सैन्याचे बनावट सहीचे पत्र दिले. त्या मोबदल्यात साक्षीदार यांना 50 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. आरोपीने फिर्यादी आणि साक्षीदार यांना विश्‍वासात घेऊन फसवणूक केली, अशी फिर्याद देण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील भानुप्रिया पेठकर यांनी केली होती.