शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

नामांकित गृहप्रकल्पांमध्ये स्वस्तात घरे

By admin | Updated: March 24, 2017 04:26 IST

शासनाच्या आदेशानुसार एक एकरापेक्षा जास्त जागेवर एखादा गृहप्रकल्प उभारल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला वाढीव

सुषमा नेहरकर-शिंदे / पुणेशासनाच्या आदेशानुसार एक एकरापेक्षा जास्त जागेवर एखादा गृहप्रकल्प उभारल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला वाढीव एफएसआय देण्यात येतो. त्याबदल्यात प्रकल्पातील २० टक्के घरे म्हाडाकडे जमा करण्यात येतात. आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील अनेक नामांकित गृहप्रकल्पांतील सुमारे ४ हजार ७८ घरे म्हाडाकडे जमा झाली असून, लवकरच या घरांचे लकी ड्रॉ पद्धतीने वाटप करण्यात येईल.शासनाने महापालिका क्षेत्रात विकास नियंत्रण नियमावलीमध्ये ‘परवडणारी घरे’ याअंतर्गत काही तरतुदी लागू करण्यात आल्या आहे. यामध्ये शासनाने सर्वसमावेशक योजनेअंतर्गत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात एक एकर किंवा त्याहून अधिक जागेवर एखादा गृहप्रकल्प उभारल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला वाढीव एफएसआय दोण्याचे धोरण करण्यात आले. या बदल्यात संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्पातील एकूण घरांच्या २० टक्के घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडतील, यासाठी ३२५ आणि ४४० चौ. फुटांची घरे बांधून म्हाडाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. ही २० टक्के घरे म्हाडाकडे वर्ग केल्यानंतरच संबंधित प्रकल्पाला भोगवटापत्र देण्याचे बंधन संबंधित यंत्रणेवर घालण्यात आले आहे. शासनाने हा अध्यादेश २०१३मध्ये लागू केला. त्यानंतर ज्या बांधकाम व्यावसायिकांना एक एकरापेक्षा अधिक जागेत प्रकल्प मंजूर करून घेतला, त्यांना या नियमानुसार २० टक्के घरे म्हाडाला देणे बंधनकारक करण्यात आले.याबाबत म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे-देशमुख यांनी सांगितले, की गेल्या दोन वर्षांत म्हाडाकडे ४ हजार ७८ घरांची नोंद झाली आहे. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील ३६ बांधकाम व्यावसायिकांनी १ हजार ३८५ घरांचा प्रस्ताव दिला आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ८० बांधकाम व्यावसायिकांना तब्बल २ हजार ६९३ घरांचा प्रस्ताव दिला आहेत. या घरांचे वाटप करण्यासाठी म्हाडाकडून लवकरच लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या घरांची विक्री करताना शासनाने अ‍ॅन्युअल शेड्यूल रेट (एसआरए)मध्ये जे दर निश्चित केले, त्यानुसार या घरांचे दर निश्चित करण्यात येणार असल्याचे काकडे-देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांना म्हडाच्या प्रकल्पाशिवाय शहराच्या प्रमुख भागामध्ये व नामांकित, सर्व सोयीसुविधा असलेल्या प्रकल्पांमध्ये स्वस्तात घरे मिळणार आहेत.