शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोटार चोरून पळणा-या चोरट्याला पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लष्कर भागात रस्त्याच्या कडेला लावलेली मोटार चोरून पळून गेलेल्या चोरट्याला गस्त घालणा-या पोलिसांनी पाठलाग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लष्कर भागात रस्त्याच्या कडेला लावलेली मोटार चोरून पळून गेलेल्या चोरट्याला गस्त घालणा-या पोलिसांनी पाठलाग करून पकडले. मोटारीतील जीपीएस यंत्रणेवरून पोलीस चोरट्यापर्यंत काही वेळातच पोहचले.

अभिषेक ऊर्फ पप्पू पवार (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

तक्रारदाराने लष्कर भागात मोटार पार्क केली होती. काही वेळानंतर ते तेथे आल्यावर त्यांना मोटार दिसली नाही. तक्रारदाराने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी लष्कर भागात पोलीस कर्मचारी वैभव हिलाल आणि संग्राम पाटील गस्त घालत होते. त्यांनी तक्रारदारांशी संपर्क साधला. मोटारीमध्ये जीपीएस यंत्रणा असल्याची माहिती मिळाल्यावर वैभव हिलाल आणि संग्राम पाटील हे तक्रारदाराला बरोबर घेऊन जीपीएस यंत्रणेद्वारे मोटारीचा मागोवा घेऊ लागले. तेव्हा मोटार पूलगेट परिसरातील एका छोट्या गल्लीत गेल्याची माहिती मिळाली. तिघेही तातडीने तिकडे गेले. तक्रारदाराने त्यांची मोटार क्रमांकावरून ओळखली. हिलाल आणि पाटील यांनी मोटार चोरट्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर मोटारचोराला पकडले.

मोटार चोरीचा गुन्हा काही वेळात उघडकीस आणणारे पोलीस कर्मचारी हिलाल व पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी कौतुक केले. त्यांच्या कामगिरीबद्दल बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.