शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘छत्रपती’ला २१ कोटी ३६ लाखांचा दंड

By admin | Updated: March 2, 2016 01:13 IST

राष्ट्रवादी (ता. इंदापूर) कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला तब्बल २१ कोटी ३६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बारामती :राष्ट्रवादी (ता. इंदापूर) कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला तब्बल २१ कोटी ३६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. २०१५-१६च्या गळीत हंगामासाठी गाळप परवानाच घेतला नाही. त्यामुळे या काळात गाळप केलेल्या उसावर प्रतिटन ५०० रुपये दराने हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम भरली नाही तर कारखान्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आदेश दिले आहेत.छत्रपती साखर कारखान्याने यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी मागील गळीत हंगामातील थकबाकी एका महिन्यात देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर साखर आयुक्तांनी गाळप परवाना दिला होता.मात्र, कारखाना व्यवस्थापनाने वारवांर साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक यांनी सुनावण्या घेऊन सूचना दिल्या. त्यानंतरदेखील संचालक मंडळाने मागील गळीत हंगामातील प्रतिटन १३० रुपये थकबाकी सभासदांना अदा केलेली नाही. छत्रपती सहकारी साखर कारखाना हा बारामतीपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असून बारामती आणि इंदापूरचे कार्यक्षेत्र याअंतर्गत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची करून गेल्या निवडणुकीत पॅनल उभे केले होते. या पॅनलला पूर्ण बहुमतही मिळाले. राष्ट्रवादी कॉँग्रेसमधूनच बंडखोरी करून बाहेर पडलेले राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचे विरोधी पॅनल होते. अजित पवार यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात छत्रपती कारखान्याच्या संचालकपदापासून झाली. गेल्या वर्षीपर्यंत बॅँकेचे प्रतिनिधी या नात्याने ते संचालक होते. कारखान्याने थकबाकी दिली नसल्याबद्दल शेतकरी कृती समितीच्या वतीने पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब कोळेकर, शिवाजी निंबाळकर यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. एफआरपीमधून कोणतीही कपात करता येत नाही. मंंत्री समितीच्या आदेशानुसार संबंधित कपात बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणले होते. त्यावर साखर आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. दंड केलेली रक्कम अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, बँक प्रतिनिधी, चीफ अकाउंटंट, कार्यकारी संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेतून वसूल करावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. दंडाची झळ कारखाना, सभासदांना बसू देऊ नये, अशीदेखील मागणी करण्यात आली आहे. कारखान्याने कारवाईला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी कृती समितीने लढा देण्याचा इशारा दिला आहे.(प्रतिनिधी)