शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शुल्कवाढ : शांतता, कारवाई सुरू आहे...

By admin | Updated: April 26, 2017 03:02 IST

शुल्कवाढीविरोधात पालकांचा आक्रोश वाढत असला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून केवळ कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे : शुल्कवाढीविरोधात पालकांचा आक्रोश वाढत असला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून केवळ कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शुल्कवाढ करणाऱ्या शाळांना नोटिसा पाठविल्या जात असल्या तरी अद्याप एकाही शाळेवर शुल्क नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई झालेली नाही. त्यामुळे पालकांना सध्या ‘शांतता, कारवाई सुरू आहे,’ असा अनुभव येत आहे.शुल्क नियंत्रण कायद्यानुसार शाळांना दोन वर्षांतून एकदा १५ टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ करता येवू शकते. मात्र, त्यासाठी शाळेतील पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक शाळांनी या समितीला टाळून येत्या शैक्षणिक वर्षासाठी अवाजवी शुल्कवाढ केली आहे. काही शाळांनी तर मागील वर्षी प्रमाणेच यंदाही शुल्कवाढ करून पालकांवर आर्थिक बोजा टाकला आहे. याबाबत पालक संघटना तसेच वैयक्तिक पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासह शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही शाळेवर कायद्यानुसार कारवाई झालेली नाही. त्यामुळे सोमवारी ‘पॉपसम’ या पालक संघटनेच्या नेतृत्वाखाली १८ ते २० शाळांतील पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन केले. उपसंचालक दिनकर टेमकर यांच्या कार्यालयात ठिय्या मारून घेराव घातला. मात्र त्यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने पालकांना पोलीस ठाणे गाठावे लागले.बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये पालक संघटनेच्या प्रतिनिधींसह टेमकर, सहायक संचालिका मीनाक्षी राऊत, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांच्या अन्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी संतप्त पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या वेळी टेमकर यांनी संबंधित शाळांवर कारवाईचे काम सुरू असून आवश्यकतेनुसार नोटीस दिल्या जात आहेत, असे त्यांना सांगितले. शाळांकडून कायद्याचे उल्लंघन होत असतानाही कायदेशीर कारवाई का केली जात नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला. त्यावर टेमकर यांनी याबाबत विधी विभागाचा सल्ला घेऊन पंधरा दिवसांत पुढील कारवाई करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे ‘पॉपसम’च्या अनुभा सहाय यांनी सांगितले.