शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शुल्कवाढीला बसणार चाप

By admin | Updated: December 10, 2015 01:37 IST

मागील काही वर्षापासून सतत वाढणाऱ्या अवाजवी शुल्क वाढीविरुद्ध विविध पालक संघटनेने छेडलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

पुणे : मागील काही वर्षापासून सतत वाढणाऱ्या अवाजवी शुल्क वाढीविरुद्ध विविध पालक संघटनेने छेडलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. कॅपिटेशन फी अ‍ॅक्टनुसार, शाळांनी तीन वर्षांतून एकदाच शुल्क आकारावे, असा आदेश पुणे विभागीय उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांना दरवर्षीच्या शुल्कवाढीच्या चक्रातून दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी अवाजवी शुल्कवाढ केली जात आहे. याविरोधात विविध पालक संघटनांनी आवाज उठवला, आंदोलने केली आहेत. पालकांची संघटना असणाऱ्या पॉपसॉम या संघटनेने गेल्या काही दिवसांपासून शिक्षण उपसंचालक जाधव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यानुसार बुधवारी दुपारी ४ वाजता पॉपसॉमच्या अध्यक्षा अनुभा सहाय व मीरा दिलीप यांच्यासमवेत जाधव यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी कॅपिटेशन फी १९८८ अ‍ॅक्टनुसार प्रत्येक शाळेने दरवर्षी शुल्कवाढ करू नये, तसेच ती तीन वर्षांतून एकदाच करावी, असा नियम आहे. याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये शाळांनी तीन वर्षांतून एकदाच शुल्कवाढ करावी, असा आदेश शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिले. जाधव म्हणाले, ‘‘ज्या शाळांनी त्या त्या वेळी अस्तित्वात आलेल्या शुल्क कायद्याप्रमाणे गत तीन वर्षांत शुल्क घेतलेली नसेल तर ती अवैध ठरणार आहे. संबंधित शाळांनी नियमानुसारच फी घ्यावी. शाळेने सुरुवातीला एका महिन्याच्या ट्युशन शुल्कइतकीच प्रवेश शुल्क आकारावे. शाळास्तरावर पालकांना गणवेश, बूट, जेवण व इतर साहित्य शाळेतून घेण्याबाबत सक्ती करू नये. तसेच सातत्याने दरवर्षी बेकायदेशीर शुल्कवाढ केली असेल तर असे शुल्क पालकांना परत करावे.’’ तसेच फी रेग्युलेशन अ‍ॅक्ट २०११ नुसार समित्या अस्तित्वात येणार आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून यासंदर्भातील तक्रारी समित्यांमार्फत सोडविल्या जातील, असेही जाधव यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)