शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शुल्कवाढीची होणार चौकशी

By admin | Updated: April 27, 2017 05:16 IST

शुल्कवाढीबाबत तक्रार आलेल्या १८ ते २० शाळांची चौकशी केली जाणार आहे. या शाळांनी शुल्कवाढ करताना सर्व नियमांचे

पुणे : शुल्कवाढीबाबत तक्रार आलेल्या १८ ते २० शाळांची चौकशी केली जाणार आहे. या शाळांनी शुल्कवाढ करताना सर्व नियमांचे पालन केले आहे की नाही, याची सखोल चौकशी होणार आहे. या चौकशी अहवालानुसार विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडून शुल्कवाढ रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.याविषयी माहिती देताना शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख म्हणाले, की शुल्कवाढीच्या तक्रारी आलेल्या शाळांची दोन-तीन दिवसांत चौकशी केली जाणार आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून चौकशी करण्याचे आदेश मिळाले आहेत. शुल्कवाढ करण्यासाठी नियमावली आहे. त्यानुसार शुल्कवाढ करताना या नियमांचे पालन झाले आहे किंवा नाही हे पाहिले जाईल. त्यानंतर तसा अहवाल विभागीय उपसंचालक कार्यालयाला पाठविला जाईल. या अहवालावर विभागीय शुल्क नियंत्रण समिती निर्णय घेईल. शुल्कवाढ अवाजवी असल्यास ती रद्द केली जाईल, असे शेख यांनी स्पष्ट केले.विभागीय नियंत्रक समितीकडे पाठविणार प्रकरणेशुल्कवाढीबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. मात्र, त्यावर कारवाई होत नसल्याने पालक संतप्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी पालकांचा संताप अनावर झाल्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पालकांनी ठाण मांडले होते. या वेळी अधिकारीही उपस्थित होते. पालकांनी शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शुल्कवाढीची प्रकरणे विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडे पाठविली जाणार आहेत. शैक्षणिक संस्थावर कारवाई : तावडे-पिंपरी : खासगी शिक्षण संस्थांना दोन वर्षांतून एकदा १५ टक्के शुल्कवाढ करण्यास मुभा आहे. परंतु, नियमबाह्य पद्धतीने शुल्कवाढ केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल, अशी भूमिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केली.विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या कलचाचणी अ‍ॅप सुविधेचे उद्घाटन कासारवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, की प्रतिवर्षी शैक्षणिक शुल्क वाढविता येणार नाही. दोन वर्षांतून एकदा १५ टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ करता येईल. पालक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून संस्थांनी शुल्कवाढीचा निर्णय घ्यायचा आहे. पालक शिक्षक संघ स्थापन करणे कायद्याने बंधनकारक केले आहे.