शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भातपिक करपले; पावसाचा फटका आता भातउत्पादकांना बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:17 IST

भातशेतीचे आगर समजल्या जाणा-या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२९५३ हेक्टरएवढे भातक्षेत्र आहे. यंदा जवळपास ८० टक्के भातलागवडी झाल्या असून भातपीक समाधानकारक होते.

पुणे : भातशेतीचे आगर समजल्या जाणा-या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२९५३ हेक्टरएवढे भातक्षेत्र आहे. यंदा जवळपास ८० टक्के भातलागवडी झाल्या असून भातपीक समाधानकारक होते. मात्र, परतीच्या पावसाचा फटका आता भातउत्पादकांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास करपा रोग पडल्याने हिरावून घेतला आहे. शेतच्या शेत या रोगामुळे भुईसपाट झाले आहे.सह्याद्रीच्या पर्वतरांगांत राहणाºया भातउत्पादक शेतकºयांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर अबलंबून असणारी भातशेती केली जाते. पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, हवेली व पुरंदर या तालुक्यांत ७२९५३ एवढे एकूण भातक्षेत्र आहे. त्यापैकी यंदा ८० टक्के क्षेत्रावर भातलागवडी पूर्ण झाल्या आहेत. भातशेती हेच या भागातील शेतकºयांच्या उदनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने या भागात राहणाºया हजारो लोकसंख्येच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाते. भातउत्पादनाचे क्षेत्र हे प्रामुख्याने जिरायती क्षेत्र असल्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती काही वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडू लागली आहे.यावर्षी मात्र पावसाने भाताला चांगली साथ दिली होती. शेतकरी यंदा चांगला उतारा मिळणार, म्हणून खूश होता. मात्र दिवाळीपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. हळव्या जातीच्या भाताचा पावसाने दाणा सडून नुकसान झाले, तर आता भातावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी डोलत असलेली भातशेती अचानक करपून जात आहे. त्यामुळे शेतकरी गडबडला आहे.>पिरंगुट : यंदा समाधानकारक पडलेल्या पावसाने मुळशी तालुक्यात भातपिके जोमात आली. परंतु काढणीच्या वेळी पडलेल्या परतीच्या पावसाने कहर केला. त्यातच भातपिकांवर पडलेल्या करपा रोगामुळे शेतकºयांवर तयार झालेले भातपिक हातून जाण्याच्या मार्गावर आहे.मागील आठवड्यात परतीचा पाऊस पडल्याने शेतात पाणी साचून आहे तसेच गेले दोन दिवस तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यात भातपिकांवरकरप्याची लागण झाल्याने भात कापावे की नको, असा प्रश्न उभा राहिला आहे. हाती आलेले भातपिक गेल्याने शेतकºयांकडून हळहळ व्यक्त होत आहे.अनेक शेतकरी काढणीवाचून चाललेले पीक हॉलर मशिनने काढत आहेत. परंतु त्यासाठी लागणारा खर्च जास्त असल्याने तसेच जनावरांना पेंढ्या मिळत नसल्याने काही शेतकरी भात कापून बांधावर अथवा खडकावर उथळ जागी वाळकी घालीत आहे. काही शेतकरी ढगाळ वातावरण जाण्याची वाट पाहत आहेत.आंदगावातील आटाळवाडी येथील अनिल आटाळे, मोहन भुकेले, विक्रम आटाळे, नामदेव आटाळे, बबन आटाळे, सदाशिव आहेर, हरिभाऊ आटाळे, बबन जोगावडे, दत्तात्रय आटाळे, लक्ष्मण शेलार, श्रीपती शेलार, प्रभाकर आटाळे, राजू भिकोले, दत्तात्रय शेडगे, ज्ञानोबा आटाळे यांच्या शेतातील पिकांवर करप्याची लागण झाली असून शेतकºयांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.