शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या ‘यू-टर्न’मुळे बदलली समीकरणे

By admin | Updated: December 15, 2015 04:09 IST

स्मार्ट सिटी आराखड्याला ठाम विरोध असल्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाबू वागस्कर मुख्य सभेमध्ये भाषणे सुरू असताना अचानक उभे राहिले

पुणे : स्मार्ट सिटी आराखड्याला ठाम विरोध असल्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाबू वागस्कर मुख्य सभेमध्ये भाषणे सुरू असताना अचानक उभे राहिले अन् स्मार्ट सिटी आराखड्याला आमचा आता विरोध राहिला नसून, त्याला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. मनसेच्या या घूमजावामुळे स्मार्ट सिटी आराखड्याची सगळी समीकरणेच बदलूून गेली तो मंजूर होण्याचा मार्गातील सर्व अडथळे दूर झाले.स्मार्ट सिटी आराखडा अंतिम मंजुरीसाठी ९ डिसेंबर रोजी मुख्य सभेमध्ये मांडण्यात आला असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याची टीका करून त्याला तीव्र विरोध करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार मुख्य सभेमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी आराखडा मंजूर करण्यास तीव्र विरोध केला होता. त्यानंतर ४ ते ५ दिवस मनसेकडून सातत्याने स्मार्ट सिटी आराखड्याला तीव्र विरोध केला जात होता.राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार १४ डिसेंबर रोजी स्मार्ट आराखड्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्य सभेचे कामकाज सुरू झाले. राज्य शासनाला अशा पद्धतीने आदेश देण्याचा अधिकारच नसल्याने ही सभा बेकायदेशीर असल्याचे सांगून मनसेच्या गटनेत्यांसह इतर नगरसेवकांनी त्याला जोरदार विरोध केला. आयुक्त मुख्य सभेच्या विरोधात राज्य शासनाकडे का गेले, मुख्य सभेने कर्तव्यात काय कसूर केली, याची विचारणा करण्यास सुरुवात केली.स्मार्ट सिटी आराखड्यावर मते व्यक्त करण्यास सुरुवात झाल्यानंतर मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांनी जोरदार भाषण करून स्मार्ट सिटी आराखड्याची चिरफाड केली. त्या म्हणाल्या, ‘‘आयुक्तांना स्मार्ट सिटीमध्ये सहभागी होण्याची एवढी घाई का झाली आहे? काही वृत्तपत्रांना हाताशी धरून आम्हाला व्हिलन ठरविले. आम्ही त्याला घाबरत नसून आमच्या मतावर ठाम आहोत.’’त्यानंतर अचानक मनसेचे गटनेते बाबू वागस्कर बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी सांगितले, ‘‘स्मार्ट सिटीबाबात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. याची मुदत वाढवून घेऊन मुख्यमंत्री स्मार्ट सिटी आराखड्याबाबत स्वयंसेवी संस्था व इतर घटकांशी चर्चा करणार आहेत. यातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीला आमचा विरोध राहणार नाही.’’बाबू वागस्कर यांच्या या निवेदनानंतर स्मार्ट सिटी आराखडा व आयुक्तांवर जोरदार टीका करणाऱ्या नगरसेवकांमध्ये नाराजीची भावना पसरली.एका फोनने झाला निर्णयामध्ये बदलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चर्चा झाली असून, त्यांनी आत्ताच फोन करून स्मार्ट आराखड्याला पाठिंबा द्यायला सांगितले असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले.