शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून सहा महिन्यांत गावाचा कायापालट

By admin | Updated: January 26, 2016 01:37 IST

भारताच्या प्रजासत्ताकाला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अनेक गावे मूलभूत सेवासुविधांपासून आजही कोसो दूर आहेत. ग्रामीण भागातील लोकांना विकासाची फळे आजही

विलास भेगडे,  तळेगाव दाभाडे भारताच्या प्रजासत्ताकाला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अनेक गावे मूलभूत सेवासुविधांपासून आजही कोसो दूर आहेत. ग्रामीण भागातील लोकांना विकासाची फळे आजही चाखता आलेली नाहीत. खासदार आणि आमदारांनी गाव दत्तक घेऊन विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी केले होते. त्यानुसार अनेक खासदार, आमदारांनी आपापल्या सोईची गावेही दत्तक घेतली. परंतु त्यांचा विकास कितपत झाला हे गुलदस्तात आहे. त्या पार्श्वभूमीवर सुनील शेळके यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकासासाठी केलेल्या आवाहनापासून प्रेरणा घेत मावळच्या अत्यंत दुर्गम भागातील डोणे गावाचा कायापालट केला आहे.‘लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठाना’च्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी लोकश्रमदानातून मावळ तालुक्याच्या डोंगरी भागातील डोणे या गावाचा थक्क करणारा कायापालट केवळ सहा महिन्यांत केला आहे. त्यामुळे बाराशे लोकसंख्येच्या गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ग्रामविकासाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.शेळके म्हणाले, ‘‘गोपीनाथ मुंडे यांच्या ग्रामीण विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी प्रतिष्ठानाने पहिला लक्षवेधी उपक्रम हाती घेतला. त्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली. प्रतिष्ठानाने खर्चाची पर्वा न करता या गावांचा विकास करण्याचा निर्धार साकार झाला आहे. त्यासाठी माझे सहकारी आणि गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली. गावविकास करताना गावात चार किमी लांबीचे सिमेंट कॉँक्रीटचे रस्ते, दोन किमीचा पक्का डांबरी रस्ता, १६ शौचालये, मंदिर आणि शाळेच्या इमारतींचे विकासकाम, प्रत्येक घरासमोर पाण्याचा नळ, संगणकयुक्त ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत, स्मशानभूमीचे सुशोभीकरणआणि विकास करता आला आहे. डोणेगावचे सरपंच संभाजी कोंडे, बाळासाहेब घोटकुले, संजय बाविस्कर, तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घारे, बाबूराव आरोटे, किसन घारे, सोपान कारके, बाबूराव चांदेकर, शिवलिंग कुंभार, नामदेव कोंडे, तुकाराम लांडगे, शेखर काळभोर, राहुल खिलारे, अंकुश घारे यांच्यासह युवा कार्यकर्ते, ग्रामस्थांनी सहभाग घेतला. गावकरी आणि महिलांनी श्रमदान केल्याने या विकासाला वेगळेच महत्त्व आहे. आमदार, खासदारांना जमले नाही, ते साध्या कार्यकर्त्याने करून दाखविल्याने सामाजिक कार्य करणाऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.सरपंच कोंडे म्हणाले, की प्रतिष्ठानाने हे गाव दत्तक घ्यावे म्हणून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी लेखी मान्यता दिली. तळ्याच्या विकासामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रथमच कायमस्वरूपी मार्गी लागल्याने महिलांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी आता पुढचा संकल्प हाती घेतला आहे. आगामी काळात प्रत्येकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, जनधन आणि विमा योजनांची खाती आणि शासकीय योजनांचा लाभ शेतकरी कुटुंबांना घेता यावा म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे गावकऱ्यांना मिळवून देण्याचे कामही सुरू झाले आहे. गावात ग्रंथालय आणि युवकांना करिअरसाठी मार्गदर्शन मिळेल, असे केंद्र उभारण्याचा प्रतिष्ठानाचा मानस आहे. (वार्ताहर)