शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चांडोली नाक्यावर दुचाकीचोर जेरबंद

By admin | Updated: October 13, 2016 02:23 IST

राजगुरुनगरच्या चांडोली टोलनाक्यावर नाकाबंदी करीत असताना खेड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आज दोन मोटारसायकलचोरांना पकडण्याची कामगिरी

राजगुरुनगर : राजगुरुनगरच्या चांडोली टोलनाक्यावर नाकाबंदी करीत असताना खेड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आज दोन मोटारसायकलचोरांना पकडण्याची कामगिरी केली. पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोली टोलनाक्यावर आज खेड पोलिसांनी नाकाबंदी लावली होती, त्या वेळी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०च्या दरम्यान काळ्या रंगाच्या बजाज पल्सार (महा- १६ एएक्स २५६३) गाडीवरून दोन तरुण जात असताना पोलिसांनी त्यांना थांबविले. कुंडलिक पाराजी भवारी (वय १९, रा. पिंपळवाडी, घोडेगाव, ता. आंबेगाव) हा गाडी चालवत होता आणि विशाल रावसाहेब गावडे (वय २१, रा. मोरेवस्ती, चिखली, ता. हवेली) हा त्याच्या मागे बसला होता. संशयावरून त्यांना गाडीसह ताब्यात घेऊन खेड पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांची चौकशी केली असता त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही गाडी चोरल्याचे सांगितले. प्रत्यक्षात गाडीचा क्रमांक एमएच १२-जीएम १०६९ असा आहे, तर इंजिन नंबर डीएचजीबीटीएच ६४१६३ असा आहे. गाडीचे मूळ मालक सागर दत्तात्रय कांबळे (रा. बनकर कॉलनी, आकाशवाणीसमोर, हडपसर, ता. हवेली) हे असल्याचे निष्पन्न झाले.ते घोडेगाव येथे विस्तार अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. त्यांनी आपली मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार २१ सप्टेंबर रोजी आॅनलाईन केली होती. गाडीचोरीची घटना घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने चोरांना घोडेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. खेडचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलीस वाय. एम. गायकवाड, जी. बी. गवारी, आर. बी. जंगले यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली. (वार्ताहर)