शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून चांदणे गँगच्या टोळक्याचा गुंडावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून चांदणे गँगच्या टोळक्याने रेकॉर्डवरील गुंडावर काेयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्ववैमनस्यातून चांदणे गँगच्या टोळक्याने रेकॉर्डवरील गुंडावर काेयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खडकी बाजार येथील कसाई मोहल्लामधील मोहरमच्या मंडपात शनिवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.

साहिल ऊर्फ भिंगरी समीर खान (वय १९, रा. खडकी बाजार) याने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शुभम आगलावे, सलमान शेख, नकुल गायकवाड, प्रजय काळे, तरुण यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, प्रतीक राहुल लोंढे (वय १८, रा. खडकी बाजार) याला अटक केली आहे.

साहिल खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. डिसेंबर २०२० मध्ये आरोपींनी फिर्यादीचे विरुद्ध पोलीस केस केली होती. खान हा शनिवारी मोहरमच्या मंडपात बसला असताना आरोपी मोटारसायकलवरून ट्रिपलसीट आले. सलमान शेख याने फिर्यादीला खुन्न्सने का पाहतो, असे म्हणून आम्ही चांदणे गँगचे भाई आहोत. खडकी भागात आमची दहशत आहे, असे म्हणून आरोपींनी साहिल खान याला घेरले. सलमान शेख याने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात व चेहऱ्यावर तसेच पायाचे मांडीवर, हातावर मारून जबर जखमी केले. फिर्यादी जीव वाचविण्यासाठी पळून जात असताना त्याच्यावर दगड फेकून मारले व परिसरात दहशत पसरवून निघून गेले.

खडकी पोलिसांनी बेकायदा जमाव जमवून दंगल माजवणे, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून प्रतीक लोंढे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक साळवी अधिक तपास करीत आहेत.